लॉकहीड कॉर्पोरेशन
Jump to navigation
Jump to search
लॉकहीड कॉर्पोरेशन अमेरिकेतील विमाने आणि अंतराळवाहने तयार करणारी कंपनी होती. १९९३मध्ये मार्टिन मॅरियेटा कंपनीशी एकत्रीकरण झाल्यावर ही लॉकहीड मार्टिनचा भाग झाली. या कंपनीचे मुख्यालय कॅलिफोर्नियातील बरबँक शहरात होते.
या कंपनीची स्थापना १९१२मध्ये ॲलन आणि माल्कम लॉकहीड या दोन भावांनी आल्को हायड्रो-एरप्लेन कंपनी या नावाने केली होती.
दुसऱ्या महायुद्धाच्या सुमारास व नंतर लॉकहीड कॉर्पोरेशनने अमेरिका तसेच दोस्त राष्ट्रांना शेकडो प्रकारची लाखो विमाने पुरवली.
विमानांशिवाय लॉकहीड कॉर्पोरेशन अंतराळयाने तसेच त्यासाठीच्या प्रणाली तयार करायची.