बियर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
गव्हापासून बनवण्यात येणारी जर्मन बियर

बियर (इंग्लिश: Beer ; जर्मन: Bier ;) हे जगातील सर्वांत जुने व सर्वाधिक सेवन केले जाणारे मद्य आहे. गहू, सातू, मका, तांदूळ इत्यादी धान्यांपासून बनवलेल्या स्टार्चावर ब्रू करण्याची व किण्वन प्रक्रिया करून बियरीची निर्मिती केली जाते. बहुतेक बियरींमध्ये नैसर्गिक परिरक्षक म्हणून हॉप वनस्पतीची फुलेही टाकतात. हॉपांच्या फुलांमुळे बियरीला कडवटपणा मिळतो. इ.स. पूर्व ९००० पासून जगात बियर बनवली गेली असल्याचे पुरावे आढळतात. बियरीला अनेक देशांच्या संस्कृतीमध्ये विशेष स्थान आहे (उदा. जर्मनीमधील बियर उत्सव). बियरीचे उत्पादन व विक्री हा जगातील एक मोठा उद्योग आहे व अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या ह्या उद्योगात आहेत.

बियरीची तीव्रता घनफळातील अल्कोहोल (लघुरूप: घन-अल्को ; इंग्लिश: Alcohol by volume, abv ;) या मानकात व्यक्त करतात. बहुतांश बियरींची तीव्रता ४% ते ६% दरम्यान असते. मात्र काही बियरींची तीव्रता १% पेक्षा कमी, तर क्वचित काही बियरींची तीव्रता २०%हून अधिक असू शकते.

प्रकार[संपादन]

बियरचे खालील मुख्य प्रकार आहेत.

यातील अनेक प्रकारांत प्रत्येकी लाइट किंवा डायेट हा कमी मेद असलेला प्रकारही असतो. २०१७ सालच्या डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रात बीअरच्या बाटलीची किंमती ह्या २० ते २५ रुपयांनी वाढल्या. महाराष्ट्र राज्यात दरमहा सरासरी बीअरच्या दोन कोटी चार लाख बाटल्यांची विक्री होते.[१]

संदर्भ[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत