बेलग्रेड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बेलग्रेड
Београд
सर्बिया देशाची राजधानी

Belgrade Montage.jpg

Flag of Belgrade.svg
ध्वज
Small Coat of Arms Belgrade.svg
चिन्ह
बेलग्रेड is located in सर्बिया
बेलग्रेड
बेलग्रेड
बेलग्रेडचे सर्बियामधील स्थान

गुणक: 44°49′14″N 20°27′44″E / 44.82056, 20.46222गुणक: 44°49′14″N 20°27′44″E / 44.82056, 20.46222

देश सर्बिया ध्वज सर्बिया
स्थापना वर्ष इ.स. पूर्व २७९
क्षेत्रफळ ३६० चौ. किमी (१४० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३८४ फूट (११७ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १२,३३,७९६
  - घनता ४,६१० /चौ. किमी (११,९०० /चौ. मैल)
  - महानगर १६,५९,४४०
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.beograd.rs


बेलग्रेड (सर्बियन: Београд; बेओग्राद) ही पूर्व युरोपातील सर्बिया देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. बेलग्रेड शहर सर्बियाच्या उत्तर-मध्य भागात सावाडॅन्यूब नद्यांच्या संगमावर वसले आहे. २०१३ साली बेलग्रेड शहराची लोकसंख्या सुमारे १२.३३ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या १६.६ लाख होती. बेलग्रेड शहर १७ महानगरपालिकांमध्ये विभागले गेले असून सर्बियामधील २२.५ टक्के लोकवस्ती येथेच एकवटली आहे.

बेलग्रेड हे १९१८ सालापासून युगोस्लाव्हिया देशाच्या राजधानीचे शहर राहिले आहे. आजच्या घडीला बेलग्रेड एक जागतिक शहर असून ते सर्बियाचे व बाल्कन प्रदेशाचे राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक केंद्र आहे.

इतिहास[संपादन]

प्रागैतिहासिक काळामध्ये हा भूभाग व्हिन्का संस्कृतीचा भाग होता. इ.स. पूर्व २७९मध्ये सेल्ट लोकांनी येथे अधिपत्य मिळवले व सिंगिदुनुम नावाच्या शहराची स्थापना केली. ऑगस्टसच्या कार्यकाळात रोमन साम्राज्याने बेलग्रेडवर विजय मिळवला व दुसऱ्या शतकादरम्यान त्याला शहराचा दर्जा दिला. पहिला कॉन्स्टन्टाइन, जोव्हियन इत्यादी रोमन सम्राटांचा जन्म बेलग्रेड भागातच झाला होता. इ.स. ३९५ साली येथे बायझेंटाईन साम्राज्याची सत्ता आली. बेओग्राद हे नाव ८७८ साली पहिल्यांदा वापरले गेले. पुढील अनेक शतके सर्बियन, बल्गेरियन, हंगेरीयन इत्यादी साम्राज्यांचा भाग राहिल्यानंतर १५२१ साली बेलग्रेडवर ओस्मानी साम्राज्याने ताबा मिळवला. सुलेमानच्या नेतृत्वाखाली ओस्मान्यांनी बेलग्रेडचा बव्हंशी भाग नष्ट केला व सर्व ख्रिश्चन धर्मीय नागरिकांना इस्तंबूलमध्ये स्थलांतरित केले.

ओस्मानी साम्राज्याच्या अधिपत्याखाली बेलग्रेडमध्ये अनेक ओस्मानी वास्तुशास्त्राच्या इमारती उभ्या राहिल्या. पुढील काळात कॉन्स्टेन्टिनोपल खालोखाल बेलग्रेड युरोपामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे ओस्मानी शहर बनले. १७व्या व १८व्या शतकात पवित्र रोमन साम्राज्याने बेलग्रेडवर कब्जा करण्याचे तीन प्रयत्न केले परंतु प्रत्येक वेळी ओस्मान्यांनी बेलग्रेडवरचा ताबा राखला. १९व्या शतकाच्या सुरूवातीपासून चालू झालेला सर्बियन स्वातंत्र्यलढा अनेक दशके सुरू होता व अखेर १८८२ साली सर्बियाच्या राजतंत्राची स्थापना झाली. स्वातंत्र्यानंतर बेलग्रेडचे सर्बियाची राजधानी म्हणून महत्त्व अधिकच वाढले व शहराचा विकास होत गेला.

पहिल्या महायुद्धात ऑस्ट्रिया-हंगेरीने २८ जुलै १९१४ रोजी सर्बियाविरुद्ध युद्ध पुकारले. पुढील एक वर्षाहून अधिक काळ चाललेल्या लढाईमध्ये बहुतेक सर्व बेलग्रेड शहर बेचिराख झाले व अखेर ९ ऑक्टोबर १९१५ रोजी जर्मन व ऑस्ट्रो-हंगेरीयन सैन्याने बेलग्रेडवर कब्जा केला. १ नोव्हेंबर १९१८ रोजी फ्रेंच सैन्याने बेलग्रेडची मुक्तता केली. १९१८ सालच्या युगोस्लाव्हिया देशाच्या निर्मितीपासून बेलग्रेड युगोस्लाव्हियाची राजधानी राहिली आहे. ह्यांमध्ये युगोस्लाव्हियाचे राजतंत्र (१९१८ - १९४१), युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक (१९४५ - १९९२), युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक (१९९२ - २००३) व सर्बिया आणि माँटेनिग्रो (२००३ - २००६) ह्या चार वेगवेगळ्या देशांचा समावेश होता.

नाटो हल्ल्यामध्ये पडझड झालेली एक इमारत

दुसऱ्या महायुद्धात प्रथम अक्ष राष्ट्रांच्या बाजूने सहभागी होणाऱ्या युगोस्लाव्हियामध्ये राजकीय बंड घडले व नव्या शासनाने नाझी जर्मनीसोबत संलग्न होण्यास नकार दिला. ६ एप्रिल १९४१ रोजी लुफ्तवाफेने बेलग्रेडवर अनेक बाँबहल्ले केले व १३ एप्रिल १९४१ रोजी जर्मनीने बेलग्रेड काबीज केले. नाझी काळात अनेक स्थानिक लोकांना ठार केले गेले. रॉटरडॅमप्रमाणे बेलग्रेडवर देखील ह्या महायुद्धात दोनवेळा बाँबहल्ले केले गेले: प्रथम अक्ष राष्ट्रांकडून व नंतर दोस्त राष्ट्रांकडून. २० ऑक्टोबर १९४४ रोजी लाल सैन्याने बेलग्रेडची सुटका केली. युद्धानंतर पुन्हा एकदा बेलग्रेडची जोमाने पुनर्बंधणी करण्यात आली. १९६२ साली येथील विमानतळ बांधण्यात आला. २००६ साली सर्बिया व माँटेनिग्रो वेगळे झाल्यानंतर बेलग्रेड सर्बियाची राजधानी बनली. १९९० च्या दशकात युगोस्लाव्हियाच्या विघटनानंतर झालेल्या कोसोव्हो युद्धादरम्यान नाटोने बेलग्रेडवर मोठा बाँबहल्ला केला. ह्या हल्ल्यात बेलग्रेडचे पुन्हा नुकसान झाले.

भूगोल[संपादन]

बेलग्रेड शहर सर्बियाच्या उत्तर-मध्य भागात सावाडॅन्यूब नद्यांच्या संगमावर समुद्रसपाटीपासून ११६.७५ मीटर (३८३.० फूट) उंचीवर वसले आहे. बेलग्रेड शहराचे क्षेत्रफळ ३५९.९६ चौरस किमी (१३८.९८ चौ. मैल) इतके आहे.

हवामान[संपादन]

बेलग्रेडमधील हवामान अर्ध-कटिबंधीय स्वरूपाचे असून येथे चारही ऋतू अनुभवायला मिळतात व चारही ऋतूंमध्ये पाउस पडतो.

हवामान तपशील: बेलग्रेड
महिना जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर वर्ष
विक्रमी कमाल °से (°फॅ) style="background:#FF8F1F;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|20.7
(69.3)

style="background:#FF7900;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|23.9
(75)

style="background:#FF5700;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|28.8
(83.8)

style="background:#FF4000;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|32.2
(90)

style="background:#FF2D00;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|34.9
(94.8)

style="background:#FF1C00;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|37.4
(99.3)

style="background:#E10000;color:#FFFFFF; font-size:85%;text-align:center;

"|43.6
(110.5)

style="background:#FF0A00;color:#FFFFFF; font-size:85%;text-align:center;

"|40.0
(104)

style="background:#FF1B00;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|37.5
(99.5)

style="background:#FF4A00;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|30.7
(87.3)

style="background:#FF5A00;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|28.4
(83.1)

style="background:#FF8205;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|22.6
(72.7)

style="background:#E10000;color:#FFFFFF; font-size:85%;text-align:center;
border-left-width:medium"|४३.६
सरासरी कमाल °से (°फॅ) style="background:#FFFEFD;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|4.6
(40.3)

style="background:#FFEDDC;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|7.0
(44.6)

style="background:#FFC892;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|12.4
(54.3)

style="background:#FFA144;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|18.0
(64.4)

style="background:#FF7C00;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|23.5
(74.3)

style="background:#FF6900;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|26.2
(79.2)

style="background:#FF5800;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|28.6
(83.5)

style="background:#FF5800;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|28.7
(83.7)

style="background:#FF7900;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|23.9
(75)

style="background:#FF9F3F;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|18.4
(65.1)

style="background:#FFD0A2;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|11.2
(52.2)

style="background:#FFF5ED;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|5.8
(42.4)

style="background:#FFA64D;color:#000000; font-size:85%;text-align:center;
border-left-width:medium"|१७.४
(६३.३)
रोजची सरासरी °से (°से) style="background:#EEEEFF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|1.4
(34.5)

style="background:#F7F7FF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|3.1
(37.6)

style="background:#FFE9D4;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|7.6
(45.7)

style="background:#FFC58B;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|12.9
(55.2)

style="background:#FFA143;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|18.1
(64.6)

style="background:#FF8D1B;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|21.0
(69.8)

style="background:#FF7F00;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|23.0
(73.4)

style="background:#FF8104;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|22.7
(72.9)

style="background:#FFA144;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|18.0
(64.4)

style="background:#FFC58B;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|12.9
(55.2)

style="background:#FFEDDB;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|7.1
(44.8)

style="background:#F5F5FF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|2.7
(36.9)

style="background:#FFC790;color:#000000; font-size:85%;text-align:center;
border-left-width:medium"|१२.५४
(५४.५८)
सरासरी किमान °से (°फॅ) style="background:#E0E0FF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|-1.1
(30)

style="background:#E6E6FF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|-0.1
(31.8)

style="background:#FAFAFF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|3.7
(38.7)

style="background:#FFE4CA;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|8.3
(46.9)

style="background:#FFC489;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|13.0
(55.4)

style="background:#FFB163;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|15.8
(60.4)

style="background:#FFA54B;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|17.5
(63.5)

style="background:#FFA44A;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|17.6
(63.7)

style="background:#FFC082;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|13.5
(56.3)

style="background:#FFDFC0;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|9.0
(48.2)

style="background:#FDFDFF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|4.2
(39.6)

style="background:#E7E7FF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|0.2
(32.4)

style="background:#FFE3C8;color:#000000; font-size:85%;text-align:center;
border-left-width:medium"|८.४७
(४७.२४)
विक्रमी किमान °से (°फॅ) style="background:#5959FF;color:#FFFFFF; font-size:85%;text-align:center;

"|-26.2
(-15.2)

style="background:#9393FF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|-15.4
(4.3)

style="background:#A3A3FF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|-12.4
(9.7)

style="background:#D4D4FF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|-3.4
(25.9)

style="background:#F4F4FF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|2.5
(36.5)

style="background:#FFF1E3;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|6.5
(43.7)

style="background:#FFDDBB;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|9.4
(48.9)

style="background:#FFEFE0;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|6.7
(44.1)

style="background:#FFFDFC;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|4.7
(40.5)

style="background:#CECEFF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|-4.5
(23.9)

style="background:#BCBCFF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|-7.8
(18)

style="background:#9E9EFF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|-13.4
(7.9)

style="background:#5959FF;color:#FFFFFF; font-size:85%;text-align:center;
border-left-width:medium"|-२६.२
वर्षाव मिमी (इंच) 46.9
(1.846)
40.0
(1.575)
49.3
(1.941)
56.1
(2.209)
58.0
(2.283)
101.2
(3.984)
63.0
(2.48)
58.3
(2.295)
55.3
(2.177)
50.2
(1.976)
55.1
(2.169)
57.4
(2.26)
६९०.८
(२७.१९७)
% आर्द्रता style="background:#0000D3;color:#FFFFFF; font-size:85%;text-align:center;

"|78

style="background:#0000EE;color:#FFFFFF; font-size:85%;text-align:center;

"|71

style="background:#0E0EFF;color:#FFFFFF; font-size:85%;text-align:center;

"|63

style="background:#1515FF;color:#FFFFFF; font-size:85%;text-align:center;

"|61

style="background:#1515FF;color:#FFFFFF; font-size:85%;text-align:center;

"|61

style="background:#0E0EFF;color:#FFFFFF; font-size:85%;text-align:center;

"|63

style="background:#1515FF;color:#FFFFFF; font-size:85%;text-align:center;

"|61

style="background:#1515FF;color:#FFFFFF; font-size:85%;text-align:center;

"|61

style="background:#0000FD;color:#FFFFFF; font-size:85%;text-align:center;

"|67

style="background:#0000EE;color:#FFFFFF; font-size:85%;text-align:center;

"|71

style="background:#0000DF;color:#FFFFFF; font-size:85%;text-align:center;

"|75

style="background:#0000CF;color:#FFFFFF; font-size:85%;text-align:center;

"|79

style="background:#0000F9;color:#FFFFFF; font-size:85%;text-align:center;
border-left-width:medium"|६८
वर्षावाचे दिवस (≥ 0.1 mm) style="background:#5E5EFF;color:#FFFFFF; font-size:85%;text-align:center;

"|13

style="background:#5C5CFF;color:#FFFFFF; font-size:85%;text-align:center;

"|12

style="background:#7777FF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|11

style="background:#5959FF;color:#FFFFFF; font-size:85%;text-align:center;

"|13

style="background:#5E5EFF;color:#FFFFFF; font-size:85%;text-align:center;

"|13

style="background:#5959FF;color:#FFFFFF; font-size:85%;text-align:center;

"|13

style="background:#8383FF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|10

style="background:#8F8FFF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|9

style="background:#7F7FFF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|10

style="background:#8383FF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|10

style="background:#6666FF;color:#FFFFFF; font-size:85%;text-align:center;

"|12

style="background:#5252FF;color:#FFFFFF; font-size:85%;text-align:center;

"|14

style="background:#6C6CFF;color:#000000; font-size:85%;text-align:center;
border-left-width:medium"|१४०
सूर्यप्रकाश (तास) style="background:#838383; font-size:85%;

"|72.2

style="background:#B2B279; font-size:85%;

"|101.7

style="background:#C5C505; font-size:85%;

"|153.2

style="background:#D6D600; font-size:85%;

"|188.1

style="background:#E1E100; font-size:85%;

"|242.2

style="background:#E7E700; font-size:85%;

"|260.9

style="background:#ECEC06; font-size:85%;

"|290.8

style="background:#E8E800; font-size:85%;

"|274.0

style="background:#DADA00; font-size:85%;

"|204.3

style="background:#CACA00; font-size:85%;

"|163.1

style="background:#ADAD98; font-size:85%;

"|97.0

style="background:#757575; font-size:85%;

"|64.5

style="background:#D1D100; font-size:85%;
border-left-width:medium"|२,११२
संदर्भ: Republic Hydrometeorological Service of Serbia[१]

वाहतूक[संपादन]

बेलग्रेडमधील शहरी वाहतूक रेल्वे, रस्ते व जलमार्गांचा वापर केला जातो. पारंपारिक परिवहनासाठी येथे अनेक ट्रॉलीबस मार्ग व ट्राम सेवा कार्यरत आहेत. भुयारी मेट्रो अथवा तत्सम जलद परिवहन सेवा उपलब्ध नसलेले बेलग्रेड हे युरोपातील फार थोडक्या राजधानीच्या शहरांपैकी आहे. बेलग्रेड निकोला टेस्ला विमानतळ हा सर्बियामधील सर्वात मोठा विमानतळ बेलग्रेड शहरामध्ये स्थित असून एअर सर्बिया ह्या सर्बियामधील राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचा प्रमुख वाहतूकतळ येथेच स्थित आहे.

खेळ[संपादन]

सर्बियन टेनिसपटू नोव्हाक जोकोविचचा जन्म बेलग्रेडमध्ये झाला. आजच्या घडीला जोकोव्हिच सर्वात यशस्वी टेनिसपटूंपैकी एक व ए.टी.पी. जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर आहे.

फुटबॉल हा बेलग्रेडमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. रेड स्टार बेलग्रेड व एफ.के. पार्टिझन हे सर्बियामधील दोन प्रमुख फुटबॉल क्लब बेलग्रेडमध्येच . सर्बिया फुटबॉल संघ आपले सामने बेलग्रेड महानगरामधूनच खेळतो.

आंतरराष्ट्रीय संबंध[संपादन]

बेलग्रेड शहराचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व वाणिज्य संबंध आहेत.

देश शहर वर्ष
ग्रीस कोर्फू 2010
युनायटेड किंग्डम कॉव्हेंट्री[२][३] 1957
अमेरिका शिकागो 2005
पाकिस्तान लाहोर 2007
स्लोव्हेनिया युबयाना[४] 2010
मॅसिडोनिया स्कोप्ये 2012
इस्रायल तेल अवीव 1990
ऑस्ट्रिया व्हियेना 2003

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Wikivoyage-Logo-v3-icon.svg विकिव्हॉयेज वरील बेलग्रेड पर्यटन गाईड (इंग्रजी)