असित सेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

असित सेन (विनोदी अभिनेते व दिग्दर्शक)

आज १८ सप्टेंबर..आज विनोदी अभिनेते व दिग्दर्शक *असित सेन* यांची पुण्यतिथी........

_*असित सेन हे हिंदी सिनेमांचे कॉमेडी किंग म्हणून ओळखले जात होते. त्यांनी ४० वर्षे बॉलीवूड चित्रपटात विनोदी पात्राचे काम करून आपली ओळख निर्माण केली व आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवले.*_

*पूर्ण नाव* -असित सेन *जन्म* -१३ मे १९१७,गोरखपूर, उत्तर प्रदेश *मृत्यू* -१८ सप्टेंबर १९९३ *पत्नी* -मुकुल सेन *कार्यक्षेत्र* -सिनेमा अभिनय *नागरिकत्त्व* - भारतीय

*जीवन* _असित सेन यांचा जन्म १३ मे १९१७ साली उत्तर प्रदेश मधील गोरखपूर शहरात झाला. त्यांना छायाचित्रणाची आवड होती. त्यांनी गोरखपूर मध्ये ‘सेन फोटो स्टुडिओ' नावाचा व्यवसाय सुरू केला._

*अभिनयाची सुरुवात* _असित सेन यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात बांग्ला नाटकांमधून केली. सन १९५० मध्ये ते कलकत्त्याला सासरी गेले होते.तिथेच त्यांना एका नाटक कंपनीत अभिनयाचे काम मिळाले. नाटक सुरू झाल्यावर फिल्म निर्देशक विमल रॉय हे त्यांच्या अभिनयावर प्रभावित झाले.व त्यांना मुंबई ला घेऊन गेले._

*प्रमुख चित्रपट* *१९६३* -चांद और सुरज *१९६५* -भूत बंगला *१९६७* -नौनिहाल *१९६८* -ब्रम्हचारी *१९६९* -यकीन और आराधना *१९७०* -पुरब और पश्चिम, दुश्मन, मझली दीदी, बुढा मिल गया. *१९७१* -मेरा गाव मेरा देश, आंनद, दूर का राही, अमरप्रेम. *१९७२* -बॉम्बे टू गोवा, बालिका वधु *१९७६* -बजरंगबली *१९७७* -आनंदआश्रम यांसह २०० पेक्षा जास्त चित्रपटात काम केलं आहे.

_*असित सेन यांनी २०० पेक्षा जास्त बॉलिवूड चित्रपटांमध्ये विनोद अभिनेत्याचे काम केले. या कामातूनच त्यांनी आपली ओळख निर्माण केली*_