टेड टर्नर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रॉबर्ट एडवर्ड टेड टर्नर तिसरा (नोव्हेंबर १९, इ.स. १९३८:सिनसिनाटी, ओहायो, अमेरिका - ) हा अमेरिकन उद्योगपती आणि दानशूर आहे. टर्नरने सीएनएन तसेच डब्ल्यूटीबीएस या दूरचित्रवाणी वृत्तवाहिन्यांची स्थापना केली. याशिवाय अटलांटा ब्रेव्ह्ज हा बेसबॉल संघ तसेच टे़ड्स मॉन्टाना ग्रिल ही रेस्टॉरंट साखळी याच्या मालकीची आहे.

टर्नरने संयुक्त राष्ट्रांना एक अब्ज अमेरिकन डॉलर दान केले.