Jump to content

विसापूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(संबळगड या पानावरून पुनर्निर्देशित)
विसापूर

विसापूर किल्ल्याची भिंत
विसापूरचे ठिकाण दाखविणारा नकाशा
विसापूरचे ठिकाण दाखविणारा नकाशा
विसापूर
नाव विसापूर
उंची 3500 फूट
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी मध्यम
ठिकाण पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव मळवली
डोंगररांग
सध्याची अवस्था
स्थापना {{{स्थापना}}}


विसापूर ऊर्फ संबळगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.[]

मुबईहून पुण्याकडे जातांना लोणावळा सोडले की लोहगड-विसापूर ही जोडगोळी गिर्यारोहकांचे लक्ष वेधून घेत असते. मळवली रेल्वेस्थानकावर उतरल्यावर समोरच दिसतो तो म्हणजे लोहगड. मात्र डोंगरामागे लपलेला विसापूर किल्ला भाजे गावात गेल्यावरच नजरेस पडतो. पवन मावळात मोडणारा हा विसापूर किल्ला खंडाळा (बोर) घाटाचे संरक्षण करतो. पूर्वीपासूनच दुर्लक्षित असलेला हा विसापूर किल्ला इतिहासात फार मोठे असे स्थान मिळवू शकला नाही. विसापूर

इतिहास

[संपादन]

मराठे इ. स. १६८२ सालच्या ऑक्टोबर महिन्यात पुण्याच्या उत्तर बाजूला स्वारीसाठी गेले. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शहाबुद्दीन चाकणमध्ये होता. मराठे लोहगडाच्या बाजूला आल्याचे समजल्यावर तो तेथे पोहचला. तेथे त्याने केलेल्या चकमकीत ६० माणसांची कत्तल झाली. तेथून मराठे विसापूर किल्ल्यावर गेल्याचे समजले म्हणून तो तेथे पोहचेपर्यंत मराठे कुसापुर गावाजवळ पोहचले. इ. स. १६८२ मध्ये मराठ्यांचा आणि मोगलांचा शिवाशिवीचा खेळ चालूच होता. ४ मार्च इ.स. १८१८ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला . तेव्हा दुसऱ्या बाजीरावाने गडावरच्या मराठ्यांना लोहगड रिकामा करायचा हूकुम सोडला अनिच्छेनेच मराठे मागे फिरले

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

[संपादन]
विसापूर किल्ला परिसर दृश्य

पायऱ्यांच्या सहाय्याने किल्ल्यावर जाताना एक मारुतीचे देऊळ आहे. बाजूलाच दोन गुहा आहेत. यात ३० ते ४० जणांची रहाण्याची सोय होते. मात्र पावसाळ्यात गुहेत पाणी साठते. गडावर पाण्याची तळी आहेत. गडावरील पठारावर लांबवर पसरलेली तटबंदी लक्ष वेधून घेते. गडावर एक मोठे जातेही आहे.गडावर प्राचीन काळातील महादेवाचं मंदिर आहेत. मंदिराच्या समोरच मोठा तलाव आहेत.[]

गडावर जाण्याच्या वाटा

[संपादन]
तटबंदी आणि रचना

मुंबई-पुणे लोहमार्गावर मळवली या छोट्या रेल्वे स्थानकावर उतरावे. येथून भाजे गावात यावे. भाजे गावातून विसापूर किल्ल्यावर जाण्यास दोन वाटा आहेत.

  • १) पहिल्या वाटेने गडावर जायचे झाल्यास वाटाडा घेणे आवश्यक ठरते. भाजे लेण्यांना जाण्यासाठी पायऱ्या आहेत. या पायऱ्या सोडून एक पायवाट जंगलात गेलेली दिसते. उजवीकडची पायवाट धरल्यावर २० मिनिटे चालून गेल्यावर काही घरे लागतात. या वाटेने आपण पुन्हा एकदा मोडकळीस आलेल्या पायऱ्यांपाशी पोहचतो. येथे बाजूलाच एक मंदिर आहे.
  • २) दुसऱ्या वाटेने भाजे गावातून गायमुख खिंडीपर्यंत यावे. गायमुख खिंडीतून डावीकडे जंगलात जाणारी वाट थेट विसापूर किल्ल्यावर घेऊन जाते.
  • ३) मळवली स्थानकातून बाहेर आल्यावर वाटेत एक्सप्रेस हायवे लागतो. हायवे पार करण्यासाठी बांधलेल्या पादचारी पुलावरून डावीकडे उतरणारा जिना उतरल्यावर पाटण गाव लागते. याच पाटण गावातून विसापूरवर जाण्याचा रस्ता आहे.

बाह्य दुवा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Palkar, Prachi Shrikant (2020-06-04). Saaj Sahyadricha. Nachiket Prakashan.
  2. ^ "पहारेकरी विसापूर उर्फ संबळगड". Dainik Prabhat (इंग्रजी भाषेत). 2020-12-22. 2021-08-26 रोजी पाहिले.