बंगाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बंगाल (बांगला: বঙ্গ बाँगो, বাংলা बांगला, বঙ্গদেশ बाँगोदेश) हा ब्रिटिश भारताच्या विभाजनाआधी आताच्या पश्चिम बंगालबांगलादेश या भूभागांचा मिळून बनला होता.

भारतीय उपखंडाच्या ईशान्य भागातील हा प्रदेश सध्या बांगलादेश व भारताच्या पश्चिम बंगाल राज्यांत विभागला गेला आहे तसेच याचे काही भाग बिहार, आसाम, त्रिपुरा आणि ओडिशा राज्यांतही आहेत. येथे मुख्यत्वे बंगाली भाषा बोलली जाते.

हा प्रदेश जगातील अतिदाट लोकवस्तीच्या प्रदेशांपैकी एक असून येथील काही भागांत प्रति चौरसकिमी ९०० व्यक्ती राहतात.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.