नृत्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

२९ एप्रिल हा जागतिक नृत्य दिन म्हणून साजरा केला जातो. नृत्य हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे.

भारतीय नृत्य इतिहास[संपादन]

भारतीय नृत्य शास्त्राचा प्राचीन ग्रंथ भरत मुनींनी लिहिलेले नाट्यशास्त्र आहे. परंतु वेदातही याचा उल्लेख आढळतो.

भारतीय नृत्यशैली[संपादन]

दहा शास्त्रीय नृत्यशैली भारतात रुजलेल्या आहेत. दोनशेहून अधिक लोकनृत्ये ही भारतात प्रचलित आहेत. यातील कुचिपुडी , ओडिसी, मणीपुरी, भरतनाट्यम् आणि कथकली , मोहिनीअट्टम या प्रमुख नृत्य पद्धती आहेत.नृत्य ही एक ६४ कलांपैकी असलेली कला आहे.