खटाव तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(खटाव या पानावरून पुनर्निर्देशित)
  ?खटाव

महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषा मराठी


खटाव हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्याचा एक तालुका आहे. या तालुक्याला तीन आमदार आहेत. २००९ साली खटाव मतदार संघाचे राजकीय दुर्बल नेतृत्व पाहून त्रिभाजन केले गेले,तालुक्यात सामर्थ्यवान राजकीय नेता अस्तित्वात नसल्याने खटाव मतदार संघ जाणीवपूर्वक नष्ट केला गेला, व शेजारच्या तीन विधान सभा मतदार संघात जोडण्यात आला.आता माण (वडुज भाग),कराड(पुसेसावली भाग)कोरेगाव(खटाव भाग) मधील 3 आमदारा वरती खटावची जादा जबाबदारी दिली गेली आहे. या आमदारांना हा भाग त्यांच्या मतदार संघाला जोडून पण निधी पूर्वी येवढाच कमी मिळतो त्यामुळे हा वाढीव जोडलेला अविकसित आणि दुर्लक्षित भाग विकासापासून दूरच आहे. खटाव मतदार संघ त्रिभंगून तालुक्याचा पुसेसावली भाग कराड मतदार संघाला, खटाव भाग कोरेगाव मतदार संघाला आणि वडूज भाग माण मतदार संघ यांना जोडला आहे. या मतदारसंघांची पुनर्रचना पूर्वीसारखी होणे गरजेचे आहे. [ संदर्भ हवा ]

मायणी गावचे माजी आमदार भाऊसाहेब गुदगे यांनी सलग चार वेळा विधानसभेवर निवडून यायचा इतिहास रचला आहे[ संदर्भ हवा ]

खटाव[संपादन]

खटाव गावास थोरले खटाव म्हणून ही ओळ्खतात. पुर्वी खटाव हे गावच तालुक्याचे मुख्य ठिकाण होते.गावात दिवाणी व फौजदारी न्यायालय होते.भोगोलिक दृष्ट्या खटाव हे तालुक्याच्या बरोबर मध्यवर्ती ठिाकानी आहे.खटाव हे प्राचीन ठिकाण असून गावचे नावच खट आणि वांग ऋषीच्या नावावरून पडले आहे.खटाव हे पूर्वीच्या वाईदेशाचे मह्त्वाचे ठाणे होते.(मावळ आणि कोकण,खान्देश सारखे पूर्वी सांगली,सातारा व सोलापूर हे तीन जिल्हे वाईदेश आणि माणदेश या भौगोलिक नावाने ओळखले जात.आज हे भाग वाई आणि माण तालुक्या पुरते मर्यादित झालेत). खटाव मध्ये यादव कालीन हेमाड पंथी मंदिरे आहेत.गावात एक ऐतहासिक भुईकोट किल्ला आहे त्याचे जतन आणि पुनाराजीवन होणे गरजेचे आहे. खटाव गावी छत्रपती शिवराय येऊन गेल्याचे नोंद आहे.गाव पूर्वी लष्करी ठाणे असल्याने येेथे लढाया होत.नेताजी पालकर यांची खटाव मध्ये लडाई झाल्याची नोंद आहे.गावात रणखांब आहे येथे लढाया होत असे.तसेच मोगली सैन्याचे देखील हे लष्करी ठिकाण होते.13 व्या शतकात येतील रामोशी लोकांनी मुस्लिम बहामनी सरदाराविरुद्ध लडाई केल्याचा उल्लेख सापडतो.कराड,वाई प्रमाणे खटाव गावचा ही इतिहास खूप जुना आहे त्याचे संशोधन होणे गरजेचे आहे.खटावला फक्त गावापुरतेच महत्त्व नाही तर आसपासचा पूर्ण तालुका आणि प्रदेश पूर्वीही,आजही खटाव म्हणूनच ओळखतात.इतिहासकाळात खटाव हा परगणा म्हणजेच खटावदेश(वाईदेशाचा भाग)होता.त्यामुळे खटाव गाव हे पुर्वी खटाव(देश)भागाचे,परगण्याचे,प्रतिनिधीत्वं करत होते.आज खटाव तालुका आणि खटाव गाव असे दोन भिन्न प्रकार आहेत.कारण खटाव हा भूभाग तालुका आहे पण मुख्यालय वडूज आहे.आणि खटाव हे खटाव तालुक्यातील एक दुय्यम दर्जाचे गाव आहे. खटाव हे तालुक्यातील सर्वात मोठे क्षेत्रफळ असलेले गाव आहे.गावास खालील तब्बल 11 गावाच्या सीमा लागून आहेत. सि.कुरोली,धाकटवाडी,लोणी,भोसरे,जाखणगाव,खातगुण,भांडेवाडी,कटगुण,धारपुडी,दरुज,भुरकवडी.

 खटाव तालुक्यात खटाव नावाची दोन ऐतिहासिक गावे आहेत.एक फक्त खटाव ज्याला थोरले खटाव ही म्हणतात आणि दुसरे कातर खटाव यालाच धाकटे खटाव असे ही म्हटले जाते.

इतिहास[संपादन]

कृष्णराव खटावकर- हे खटावचे रहाणारे असून मराठी साम्राज्यांत धुमाकूळ घालणारे म्हणून प्रख्यात होते. यांचे पूर्वज निजामशाहींत बाराहळ्ळी येथें रहात असत. येथील पाटिलकी त्यांची होती. वडिलांचें नांव मंबाजी. त्यांनां दोन मुलें झालीं. राघो व कृष्ण. हे धार्मिक असल्यानें व्यंकोबाचे गिरीवर त्यानीं अनुष्ठान केलें. हे माध्वमतानुयायी देशस्थ होते. दिल्लीकर मोंगलाने कृष्ण यास खटावची ठाणेदारी दिली. परंतु त्यांचा वंश परत बाराहळ्ळी येथें गेला. राघोपंत खटावास राहिले. त्यांचा पुत्र भगवंत व त्यांचा प्रसिद्ध कृष्णराव. हे फार शूर होते. यांनीं खटाव येथील कोटांतील मशीद पाडली व दत्ताचें मंदिर बांधलें. या मंदिरांत त्यांची पुस्तकशाळा होती. ते विद्वान् होते. त्यांनीं १२ लेखक (नवीन ग्रंथ उतरून घेण्यासाठीं) पदरीं बाळगले होते. ते स्वतः न्याय व व्याकरण यांत पारंगत होते. यांचें कुलदैवत खंडोबा. त्यांनीं जेजूरींचें देऊळ बांधिलें. हल्लींचे खंडोबांचें जें मुख्य देऊळ ते यांच्या हातचें असून भोंवतालचा प्राकार होळकर वगैरेंनीं बांधलेला आहे. चंपाषष्ठीच्या दिवशीं पहिला नैवेद्य यांच्याकडील असतो. शाहु महाराज दक्षिणेंत उतरले व साताऱ्यास येऊन गादीवर बसले त्यावेळीं कृष्णराव हे ताराबाईच्या बाजूस होते. त्यांनीं नांवाला मोंगलांच्या तर्फेचें निमित्त करून सर्व माणदेश हाताखालीं घातला (१७०८). संभाजी महाराजांच्या वधानंतर हे मोंगलास मिळाले होते व त्यांच्या आश्रयानें मराठी साम्राज्यांत लुटालूट करीत असत. मोंगलानें यांना राजा हा किताब दिला होता. यांनीं मोंगलाचें अनुकरण गोषाच्या चालीपर्यंत केलें होतें. शेजारच्या बुध व मलवडीच्या घाटग्यांचें कांहीं देशमुखी उत्पन्न यांनीं दाबलें. मोंगलानें खटाव परगणा यांनां जहागीर दिला. स्वराज्याविरुद्ध यांनीं मोंगलास पुष्कळ वर्षें मदत केली. मुळापासून हे बंडखोरच. पुढें शाहू महाराजांनीं बाळाजी विश्वनाथ व श्रीपतराव प्रतिनिधी यांस त्यांच्यावर पाठविलें. कृष्णराव शौर्यानें लढले. परंतु अखेरीस ते व त्यांचा वडील पुत्र हे दोघे लढाईंत पडले. दुसरे दोन पुत्र महाराजांस शरण आले. तेव्हां त्यांनीं क्षमा करून त्यांचें वचन पुढें चालविलें. कृष्णरावांनीं संस्कृतांत लिहिलेली विष्णूसहस्त्रनामावली वरील द्वैतमती टीका उपलब्ध आहे.

कातरखटाव (कातर-खटाव) : -

कातरखटाव हे खटाव तालुक्यातील एक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण आहे. येथे कात्रेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. येथे महादेवाची मोठी यात्रा भरते.

मायणी : मायणी गावात य‌‌‌शवंतबाबा महाराज आणि सारूताई माऊली ही दोन भक्तांची आशास्थाने प्रसिद्ध आहेत.

हिंगणे.. या ठिकाणी जानुबाई देवींची मोठी यात्रा भरते

पुसेगाव या ठिकणी सेवागिरी महाराजांची मोठी यात्रा भरते.

निमसोड हे एक गाव खटाव तालुक्यामधील गाव आहे. हे गाव राजकीय वारसा म्हणून गाजले आहे या गावात सिद्धनाथ देवाची मोठी यात्रा भरते.

तालुक्याचे मुख्यालय -:वडूज

खटाव तालुक्यातील प्रमुख शहरे व त्यांची (२०११ च्या जनगणनेनुसार) लोकसंख्या : -:

 • वडूज - (लोकसंख्या - 32, 636
 • मायणी - (लोकसंख्या - 15, 570)
 • खटाव - (लोकसंख्या - 11234
 • पुसेगाव - (लोकसंख्या - 12780

तालुक्यातली मोठी खेडी :-

 • कलेढोण - 8, 639
 • पुसेसावळी - 7, 658
 • औंध - 6, 987
 • निमसोड -10, 946
 • चितळी -7, 128
 • बुध -7, 156
 • खटाव लगतच पुर्वेला " धारपुडी "

तालुक्यातील गावे[संपादन]

आमळेवाडी अंबावडे आंभेरी अनपाटवाडी (खटाव) अनफळे औंध (खटाव) बाणपुरी भांडेवाडी भोसरे (खटाव) भुरकवाडी भुषणगड बिताळेवाडी बोंबळे बुध (खटाव) चिंचणी (खटाव) चिताळी चोरडे दाळमोडी दांभेवाडी दराजाई दारूज दातेवाडी धाकरवाडी (खटाव) धारपुडी ढोकळवाडी धोंडेवाडी (खटाव) डिसकळ एंकुळ फडतरवाडी (खटाव) गाडेवाडी (खटाव) गणेशवाडी (खटाव) गराळेवाडी गारावाडी गारूडी (खटाव) गिरीजाशंकरवाडी गोपुज गोरेगाव (खटाव) गोसाव्याचीवाडी गुंदेवाडी (खटाव) गुरसाळे (खटाव) हिंगणे हिवरवाडी होळीचागाव हुसेनपूर (खटाव) जयगाव जाखणगाव जांब (खटाव) कळंबी काळेढोण काळेवाडी (खटाव) कामठी तर्फे परळी (खटाव) कान्हारवाडी कानकात्रे कानसेवाडी करंदेवाडी (खटाव) कातळगेवाडी कातरखटाव काटेवाडी (खटाव) कातगुण खबाळवाडी खाराशिंगे खटाव खाटगुण खाटवळ कोकराळे कुमठे (खटाव) कुर्ले (खटाव) कुरोळी लाडेगाव (खटाव) लालगुण लांडेवाडी (खटाव) लक्ष्मीनगर (खटाव) लोणी (खटाव) मांडवे (खटाव) मानेतुपेवाडी मांजरवाडी मारदवाक मायणी म्हासुर्णे मोळ मोराळे मुळीकवाडी (खटाव) मुसंदेवाडी नागनाथवाडी नाईकाचीवाडी नांदोशी नाथवळ नवलेवाडी (खटाव) नेर (खटाव) निढाळ निमसोड पाचवड (खटाव) पडाळ पळसगाव (खटाव) पळशी (खटाव) पांढरवाडी (खटाव) पांगरखेळ पारगाव (खटाव) पवारवाडी (खटाव) पेडगाव (खटाव) पिंपरी (खटाव) पोफळकरवाडी पुसेगाव पुसेसावळी राहटाणी राजापूर (खटाव) रामेश्वर (खटाव) रामोशीवाडी रणशिंगवाडी रेवळकरवाडी सातेवाडी शेणावडी शेंडगेवाडी (खटाव) शिंदेवाडी (खटाव) शिरसावाडी सुंदरपूर (खटाव) सुर्याचीवाडी ताडवळे (खटाव) तरसवाडी थोरवेवाडी त्रिमळी उंबर्डे (खटाव) उंबरमाळे उंचीठाणे वडगाव (खटाव) वाडी (खटाव) वडखळ (खटाव) वडुज वांझोळी वरधानगड वारूड (खटाव) वेताणे विखाळे विसापूर (खटाव) वाकळवाडी (खटाव) वाकेश्वर यारळवाडी येळीव (खटाव) येळमारवाडी

संदर्भ[संपादन]

 1. https://villageinfo.in/
 2. https://www.census2011.co.in/
 3. http://tourism.gov.in/
 4. https://www.incredibleindia.org/
 5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
 6. https://www.mapsofindia.com/
 7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
 8. https://www.weather-atlas.com/en/india-climate

बाह्य दुवे[संपादन]

सातारा जिल्ह्यातील तालुके
सातारा तालुका | जावळी तालुका | कोरेगाव तालुका | वाई तालुका | महाबळेश्वर तालुका | खंडाळा तालुका | फलटण तालुका | माण तालुका | खटाव तालुका | कराड तालुका | पाटण तालुका