Jump to content

दादर–सोलापूर रेल्वेमार्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दादर-सोलापूर पट्टा या पानावरून पुनर्निर्देशित)
दादर-सोलापूर पट्टा (मुंबई–चेन्नई रेल्वेमार्गाचा भाग)
प्रदेश महाराष्ट्र
मालक भारतीय रेल्वे
चालक मध्य रेल्वे
तांत्रिक माहिती
मार्गाची लांबी ४४६ किमी (२७७ मैल)
ट्रॅकची संख्या १/२
गेज १६७६ मिमी ब्रॉड गेज
विद्युतीकरण अंशत:
कमाल वेग १३० किमी/तास

दादर-सोलापूर पट्टा हा भारतीय रेल्वेतील मुंबई-चेन्नई रेल्वेमार्गाचा एक प्रशासकीय भाग आहे. याची कक्षा मुंबईच्या दादर उपनगरापासून सोलापूर पर्यंत आहे. या पट्ट्यात कल्याण, पुणे, दौंड, कुर्डुवाडी ही मोठी रेल्वे जंक्शन व स्थानके आहेत.

मार्ग

[संपादन]

हा मार्ग मुंबईतील दादर येथून सुरू होतो. येथे पश्चिम रेल्वेचा मुंबई वडोदरा मार्ग समांतर आहे. उत्तर व ईशान्येकडे जाताना ठाण्याची खाडी ओलांडल्यावर कल्याण येथे नागपूरकडे जाणारा मार्ग वेगळा होतो. येथून दक्षिणेकडे तीव्र वळण घेत हा मार्ग आग्नेयेकडे कर्जत येथे पोचतो. कर्जत स्थानकात सोलापूरकडे जाणाऱ्या गाड्यांना दोन किंवा तीन अधिक इंजिने लावली जातात. पळसदरी येथून हा मार्ग बोरघाट चढून खंडाळालोणावळा येथे घाटमाथ्यावर येतो. येथून पुढे हा मार्ग इंद्रायणी काठाने पुणे येथे पोचतो. येथे कोल्हापूर-सांगलीकडे जाणारा मार्ग दक्षिणेकडे जातो. चेन्नईकडे जाणारा मार्ग दौंडकडे जातो. येथपर्यंतचा मार्ग दोन पदरी आणि विद्युतीकरण झालेला आहे. पुढे भीमा नदीच्या खोऱ्यातून कुर्डुवाडीमार्गे सोलापूर येथे हा पट्टा जातो.

इतिहास

[संपादन]

विद्युतीकरण

[संपादन]

इंजिने

[संपादन]

प्रमुख गाड्या

[संपादन]