कुर्डुवाडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?कुर्डुवाडी

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
Map

१८° ०४′ ४८″ N, ७५° २५′ ४८″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• ५१६ मी
जिल्हा सोलापूर
लोकसंख्या २२,७३३ (२००१)
नगरध्यक्ष समीर भाई मुलाणी
उपनागरध्यक्ष उर्मिला बागल

कुर्डुवाडी हे सोलापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे स्टेशन आहे. कुर्डूवाडी गावाचे प्राचीन नाव गोसाव्याची वाडी असे होते. कुर्डुवाडी हे गाव तालुक्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे गाव आहे येथील बाजारपेठ तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे कुर्डुवाडी ही नगरपालिका आहे व मध्य रेल्वेचे एक जंक्शन आहे. येथे मध्य रेल्वेचा मुंबई-चेन्नई ब्रॉडगेज मार्ग व लातूर-मिरज हे मार्ग एकमेकांना मिळतात. लातूर-मिरज हा मार्ग अनेक दशके नॅरोगेज रेल्वेमार्ग होता.

इ.स. २००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २२,७७३ होती.