दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग
प्रदेश दिल्ली, हरयाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरातमहाराष्ट्र
सुरूवात−शेवट नवी दिल्ली
मुंबई
मालक भारतीय रेल्वे
चालक उत्तर रेल्वे, उत्तर मध्य रेल्वे, पश्चिम मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे
तांत्रिक माहिती
मार्गाची लांबी १,३८६ किमी (८६१ मैल)
ट्रॅकची संख्या
गेज १६७६ मिमी ब्रॉड गेज
विद्युतीकरण २५ किलोव्होल्ट एसी; १९८०-१९९१ दरम्यान
कमाल वेग १६० किमी/तास

दिल्ली-मुंबई रेल्वेमार्ग हा भारतामधील एक प्रमुख रेल्वेमार्ग आहे. दिल्लीमुंबई ह्या दोन मोठ्या महानगरांना जोडणारा हा १,३८६ किमी लांबीचा मार्ग दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरातमहाराष्ट्र ह्या राज्यांमधून धावतो. मथुरा, कोटा, रतलाम, वडोदरा, सुरत, वापी इत्यादी भारतातील मोठी शहरे ह्याच मार्गावर आहेत.

दिल्ली व मुंबई दरम्यान धावणाऱ्या मुंबई राजधानी एक्सप्रेस, ऑगस्ट क्रांती राजधानी एक्सप्रेस, तिरुवनंतपुरम राजधानी एक्सप्रेस, मुंबई नवी दिल्ली दुरंतो एक्सप्रेस, पश्चिम एक्सप्रेस इत्यादी गाड्या ह्याच मार्गाचा वापर करतात.

चर्चगेट ते डहाणूदरम्यान धावणाऱ्या मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावरील लोकल हाच रेल्वेमार्ग वापरतात.