रेल स्प्रिंग कारखाना
Appearance
रेल स्प्रिंग कारखाना (इंग्लिश: Rail Wheel Factory) हा भारतीय रेल्वेचा एक कारखाना आहे. मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर शहराच्या १२.८ किमी दक्षिणेस सिथौली रेल्वे स्थानकानजीक स्थित असलेल्या ह्या कारखान्यामध्ये रेल्वेच्या इंजिन, प्रवासी तसेच मालवाहतूक डबे इत्यादींमध्ये वापरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या स्प्रिंगांचे उत्पादन केले जाते.
रेल स्प्रिंग कारखान्याचे उद्घाटन २५ एप्रिल १९९० रोजी तत्कालीन रेल्वेमंत्री जॉर्ज फर्नान्डिस ह्यांनी केले.