संपर्क क्रांती एक्सप्रेस
Jump to navigation
Jump to search

हजरत निजामुद्दीन-मुंबई महाराष्ट्र संपर्क क्रांती एक्सप्रेस
संपर्क क्रांती एक्सप्रेस ही भारत देशामधील भारतीय रेल्वेद्वारे चालवली जाणारी एक विशेष प्रवासी रेल्वे सेवा आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री नितीश कुमार ह्यांनी २००४-०५ सालच्या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये ह्या गाड्यांची घोषणा केली होती. संपर्क क्रांती गाड्या अनेक राज्यांमधील महत्त्वाच्या शहरांना राष्ट्रीय राजधानी दिल्लीसोबत जोडतात. राजधानी एक्सप्रेसच्या धर्तीवर चालू करण्यात आलेल्या संपर्क क्रांती एक्सप्रेस गाड्या राजधानीपेक्षा कमी दरात प्रवासी सेवा पुरवतात. पहिली संपर्क क्रांती एक्सप्रेस दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन ते बंगळूरच्या यशवंतपूर स्थानकांदरम्यान ८ फेब्रुवारी २०००८ रोजी धावली.
मार्ग मराठवाडा संपर्क क्रांती एक्सप्रेस हुजूर साहेब नांदेड ते हझरत निझामुद्दिन[संपादन]
सध्या एकूण १९ संपर्क क्रांती एक्सप्रेस मार्ग कार्यरत आहेत.
संदर्भ आणि नोंदी[संपादन]