वंदे भारत एक्सप्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
IR VB.jpg
वंदे भारत एक्सप्रेस
बिलासपूर - नागपूर वंदे भारत एक्सप्रेस
माहिती
सेवा प्रकार अर्ध-द्रुतगती रेल्वे
सद्यस्थिती चालू
प्रथम धाव १५ फेब्रुवारी २०१९
चालक कंपनी इंडियन रेल्वे केटरिंग ॲन्ड टुरिझम कॉर्पोरेशन
मार्ग
प्रवासीसेवा
प्रवासवर्ग चेअर कार, प्रथम श्रेणी
बसण्याची सोय होय
झोपण्याची सोय नाही
मनोरंजन वाय-फाय सुविधा
इतर सुविधा स्वयंचलित दरवाजे, सीसीटिव्ही कॅमेरे
तांत्रिक माहिती
गेज ब्रॉड गेज
विद्युतीकरण २५ किलोव्होल्ट
वेग १३० किमी/तास

वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक अर्ध-द्रुतगती रेल्वे सेवा आहे. संपूर्ण भारतीय बनावटीची ही रेल्वेगाडी चेन्नई येथील इंटिग्रल कोच कारखान्यामध्ये उत्पादित करण्यात आली. भारत सरकारच्या मेक इन इंडिया ह्या उपक्रमाअंतर्गत १८ महिन्यांच्या कालावधीत १०० कोटी रुपये खर्चून ह्या रेल्वेगाडीची संकल्पना, विकास व निर्मिती केली गेली. १५ फेब्रुवारी २०१९ रोजी पहिली वंदे भारत एक्सप्रेस नवी दिल्ली ते वाराणसी ह्या शहरांदरम्यान धावली. आजच्या घडीला नवी दिल्ली-वाराणसी , नवी दिल्ली-कटरा , मुंबई ते अहमदाबाद , मुंबई ते सोलापूर , मुंबई ते साईनगर शिर्डी ह्या वंदे भारत एक्सप्रेस गाड्या कार्यरत आहेत. वंदे भारत एक्सप्रेसचा कमाल वेग १३० किमी/तास इतका असून २०२३ सालापर्यंत ७५ गाड्या चालवण्याचा भारतीय रेल्वेचा विचार आहे.

इतिहास[संपादन]

भारतामध्ये रेल्वे वाहतूक गेले अनेक दशके कार्यरत असली तरीही देशामध्ये एकही द्रुतगती रेल्वे नव्हती. सुमारे ९९ मैल/तास इतक्या कमाल वेगाने धावणारी गतिमान एक्सप्रेस ही भारतामधील सर्वात जलद रेल्वेगाडी होती. द्रुतगती रेल्वेमार्ग बांधण्याऐवजी विद्यमान मार्गांचा वापर करून द्रुतगती रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी रेल्वेचे प्रयत्न सुरू होते. वेगाबरोबरच खर्च व सुरक्षितता देखील विचरात घेणे रेल्वेला आवश्यक वाटत होते. २०१७ साली रेल्वेने ट्रेन १८ नावाचा प्रकल्प हाती घेतला ज्याअंतर्गत २०१८ सालापर्यंत विजेवर धावणारी संपूर्ण भारतीय बनावटीची रेल्वेगाडी विकसित करण्याचा निर्धार करण्यात आला. ऑक्टोबर २०१८ मध्ये ह्या गाडीची पहिली चाचणी यशस्वीरित्या पार पडली व फेब्रुवारी २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी वंदे भारत एक्सप्रेसच्या पहिल्या प्रवासी सेवेला हिरवा बावटा दाखवला. नवी दिल्ली-वाराणसी वंदे भारत एक्सप्रेसच्या प्रचंड लोकप्रियतेनंतर रेल्वेने ऑक्टोबर २०१९ मध्ये नवी दिल्ली-वैष्णोदेवी ही दुसरी वंदे भारत गाडी चालू केली. ह्या गाडीच्या धर्तीवर राजधानी एक्सप्रेसच्या ऐवजी धावणारी ट्रेन २० नावाची अद्ययावत गाडी देखील विकसनशील आहे.

रचना व बनावट[संपादन]

वंदे भारत एक्सप्रेसच्या विद्यमान रचनेमध्ये १६ डबे असून त्यात एकूण १,१२८ प्रवासी बसू शकतात. गाडीच्या दोन्ही बाजूंस चालकांचे कक्ष असल्यामुळे ही गाडी दोन्ही दिशांना धावू शकते. संपूर्णपणे वातानुकुलित असलेल्या ह्या गाडीत शयनयान सुविधा नसून केवळ बसण्याची सोय आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी वाय-फाय, गाडीचा वेग, पुढील स्थानक इत्यादी माहिती पुरवणारी यंत्रणा, स्वयंचलित दरवाजे, आपोआप फ्ल्श होणारी शौचालये, इत्यादी अनेक अद्ययावत सुविधा ह्या गाडीमध्ये देण्यात आल्या आहेत.

सेवा[संपादन]

क्र. गाडी नाव गाडी क्रमांक क्षेत्र कधी धावते अंतर वेग (km/h) उद्घाटन
कमाल वेग सरासरी वेग
वाराणसी जंक्शन - नवी दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस २२४३५/२२४३६ उत्तर मध्य रेल्वे आठवड्यातून ५ दिवस ७५९ किमी (४७२ मैल) १३० किमी/ता (८१ मैल/तास) ९४ किमी/ता (५८ मैल/तास) [१] १५ फेब्रुवारी २०१९
नवी दिल्ली - श्री माता वैष्णोदेवी कटरा वंदे भारत एक्सप्रेस २२४३९/२२४४० उत्तर रेल्वे क्षेत्र आठवड्यातून ६ दिवस ६५५ किमी (४०७ मैल) १३० किमी/ता (८१ मैल/तास) ८२ किमी/ता (५१ मैल/तास) [२] ३ ऑक्टोबर २०१९
मुंबई सेंट्रल ते गांधीनगर २०९०१/२२९०२ दक्षिण रेल्वे क्षेत्र ३० सप्टेंबर २०२२
नवी दिल्ली - अंब अंदौरा वंदे भारत एक्सप्रेस २२४४७/२२४४८ १३ ऑक्टोबर २०२२
एम जी आर चेन्नई सेंट्रल - म्हैसूर वंदे भारत एक्सप्रेस ११ नोव्हेंबर २०२२
बिलासपूर - नागपूर वंदे भारत एक्सप्रेस ११ डिसेंबर २०२२
हावडा - न्यू जलपाईगुडी वंदे भारत एक्सप्रेस ३० डिसेंबर २०२२
विशाखापट्टणम - सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस १५ जानेवारी २०२२
मुंबई सीएसएमटी - सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस १० फेब्रुवारी २०२२
१० मुंबई सीएसएमटी - साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस १० फेब्रुवारी २०२२

संदर्भ[संपादन]

  1. ^ "New-Delhi Varanasi Vande Bharat Express details". India Rail Info.
  2. ^ "New-Delhi Katra Vande Bharat Express details". India Rail Info.