कोलकाता मेट्रो
Appearance
कोलकाता मेट्रो | |
---|---|
मेट्रो गाडीचे चित्र | |
मालकी हक्क | कोलकाता मेट्रो रेल कॉर्पोरेशन |
स्थान | कोलकाता, पश्चिम बंगाल |
वाहतूक प्रकार | जलद परिवहन |
मार्ग | १ |
मार्ग लांबी | २८.१४ कि.मी. |
एकुण स्थानके | २४ |
सेवेस आरंभ | २४ ऑक्टोबर १९८४ |
कोलकाता मेट्रो (बांगला: কলকাতা মেট্রো)' ही कोलकाता शहरामधील एक जलद परिवहन रेल्वेसेवा आहे. १९८४ सालापासून कार्यरत असलेली कोलकाता मेट्रो भारतामधील सर्वात जुनी मेट्रो मानली जाते. सध्या एकाच मार्गावर धावणाऱ्या ह्या मेट्रोची २४ स्थानके आहेत. हा मार्ग भारतीय रेल्वेतर्फे चालवला जातो.
पूर्व-पश्चिम धावणाऱ्या दुसऱ्या १४.६७ किमी लांबीच्या दुसऱ्या मार्गाचे बांधकाम सुरू असून २०१५ साली हा मार्ग कार्यरत होईल असा अंदाज आहे.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत