मुंबई–चेन्नई लोहमार्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मुंबई-चेन्नई रेल्वेमार्ग या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग
प्रदेश महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशतमिळनाडू
मालक भारतीय रेल्वे
चालक मध्य रेल्वे, दक्षिण मध्य रेल्वे, दक्षिण रेल्वे
तांत्रिक माहिती
मार्गाची लांबी १,२८१ किमी (७९६ मैल)
ट्रॅकची संख्या १/२
गेज १६७६ मिमी ब्रॉड गेज
विद्युतीकरण अंशत:
कमाल वेग १३० किमी/तास
मार्ग नकाशा
Mumbai-Chennai Express Trains Route map.jpg

मुंबई-चेन्नई रेल्वेमार्ग हा भारतामधील एक प्रमुख रेल्वेमार्ग आहे. मुंबईचेन्नई ह्या दोन मोठ्या महानगरांना जोडणारा हा १,२८१ किमी लांबीचा मार्ग महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशतमिळनाडू ह्या राज्यांमधून धावतो. हा मार्ग मुंबई-सोलापूर-गुंटकल-चेन्नई इग्मोर असा आहे. महाराष्ट्रातील लोणावळा, पुणे, दौंड, सोलापूर इत्यादी महत्त्वाची स्थानके ह्याच मार्गावर आहेत.

प्रशासकीय सोयीसाठी हा मार्ग खालील ४ पट्ट्यांमध्ये विभागला गेला आहे.

इतिहास[संपादन]

भारतामधील पहिली रेल्वे १६ एप्रिल १८५३ रोजी व्हिक्टोरिया टर्मिनस ते ठाणे दरम्यान धावली. १८५४ मध्ये हा मार्ग कल्याणपर्यंत वाढवला गेला. १८६२ साली बोरघाटामध्ये रेल्वेमार्गाचे काम पूर्ण झाले व मुंबई व पुणे रेल्वेद्वारे जोडले गेले. १८७१ साली रायचूर येथे मद्रास रेल्वे व ग्रेट इंडियन पेनिस्युला रेल्वे ह्यांचे मार्ग जुळले व मुंबई व मद्रास हा मार्ग पूर्ण झाला.

मुंबई व चेन्नई दरम्यान धावणाऱ्या दादर चेन्नई इग्मोर एक्सप्रेस, मुंबई-चेन्नई मेल इत्यादी गाड्या ह्याच मार्गावरून धावतात.