Jump to content

इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड

इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड (इंग्लिश: Ircon International Limited) ही भारतीय रेल्वेची एक अभियांत्रिकी व स्थापत्य कंपनी आहे. इरकॉनची स्थापना भारत सरकारने १९७६ साली इंडियन रेल्वे कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड ह्या नावाने केली. सुरुवातीला केवळ रेल्वेसाठी पायाभूत बांधणी प्रकल्प चालवणाऱ्या इरकॉनने इतरही वाहतूक क्षेत्रांमध्ये काम करण्यास सुरुवात केली.

इरकॉनने भारतामधील ३०० तर जगातील २१ इतर देशांमध्ये १२१ पायाभूत प्रकल्प पूर्ण केले आहेत. नवी दिल्ली येथे इरकॉनचे मुख्यालय असून २०१० साली तिचे निव्वळ उत्पन्न १.८२२ अब्ज रुपये इतके होते.

बाह्य दुवे

[संपादन]