चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा
Jump to navigation
Jump to search
संकेतस्थळ | www.clw.indianrailways.gov.in |
---|
चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा (इंग्लिश: Chittaranjan Locomotive Works, बंगाली: চিত্তরঞ্জন লোকোমোটিভ ওয়ার্কস) हा भारतीय रेल्वेचा एक कारखाना आहे. पश्चिम बंगाल राज्यातील चित्तरंजन शहरामध्ये असलेल्या ह्या कारखान्यामध्ये पूर्वी दगडी कोळशावर चालणाऱ्या रेल्वे इंजिनांचे उत्पादन होत असे. आता तेथे प्रामुख्याने विजेच्या इंजिनांचे उत्पादन करण्यात येते. चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा ही रेल्वे इंजिने बनवणाऱ्या जगामधील मोठ्या कारखान्यांपैकी एक आहे.
इ.स. १९५० साली चालू झालेल्या ह्या कारखान्याला भारतीय स्वातंत्र्यसेनानी चित्तरंजन दास ह्यांचे नाव दिले गेले आहे.