पॅलेस ऑन व्हील्स
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
पॅलेस ऑन व्हील्स ही राजस्थानात धावणारी भारतीय रेल्वेची रेल्वेगाडी आहे. पर्यटनवृद्धीकरता सुरू केलेली ही आलिशान रेल्वेगाडी राजस्थानातील विविध पर्यटनस्थळांना भेट देत प्रवास करते. भारतीय रेल्वेच्या ताफ्यातील चार आलिशान रेल्वेगाड्यांपैकी ही एक आहे. ही रेल्वे 1982 पासून सेवा देत आहे.
मार्ग
[संपादन]ही रेल्वेगाडी नवी दिल्लीहून सुटते. आठ दिवसांच्या प्रवासात ती जयपूर, जैसलमेर, जोधपूर, सवाई माधोपूर, चित्तोडगढ, उदयपूर, भरतपूर, फतेहपूर सिक्री, आग्रा या पर्यटनस्थळांवर थांबे घेते. हवा महल, रणथंबोर राष्ट्रीय उद्यान, जग निवास, जग मंदिर, केवलदेव राष्ट्रीय उद्यान व ताजमहाल ही या प्रवासातील खास आकर्षणे आहेत.
सेवासुविधा
[संपादन]'पॅलेस ऑन व्हील्स' मध्ये राजपूत संस्थानीपद्धतीची राजेशाही अंतर्गत सजावट असलेली १४ स्वतंत्र सलुने असून प्रत्येक सलूनमध्ये विश्रामकक्ष व पाकगृह आहे. सर्व सलुने वातानुकूलित असून इंटरकॉम, म्युझिक सिस्टम, उंची फर्निचर, पलंग अश्या सुविधांनी सज्ज आहेत. गाडीत राजस्थानी, भारतीय, चायनीज, कॉंटिनेंटल खाद्यपदार्थ देणारी दोन रेस्टॉरंटे, तसेच बार व प्रत्येक डब्याकरता छोटेखानी ग्रंथालयेदेखील आहेत.
प्रारंभी ही गाडी केवळ परदेशी पर्यटकांकरता मर्यादित होती. मात्र कालांतराने ती भारतीय पर्यटकांनाही खुली करण्यात आली. मात्र, गाडीचे भाडे अमेरिकन डॉलरमध्ये सांगितले जाते. भारतीय पर्यटकांनादेखील अमेरिकन डॉलरच्या त्या-त्या वेळच्या रुपयाच्या विनिमय दरानुसार भाडे भरावे लागते.
बाह्य दुवे
[संपादन]- पॅलेस ऑन व्हील्स.नेट - 'पॅलेस ऑन व्हील्स'चे अधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)
- पॅलेस ऑन व्हील्स (इंग्लिश मजकूर)