Jump to content

पारसिक बोगदा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Parsik tunnel; पारसिकचा बोगदा; 帕西克隧道; railway tunnel in India; railway tunnel in India; Eisenbahntunnel in Indien
पारसिकचा बोगदा 
railway tunnel in India
माध्यमे अपभारण करा
प्रकार
  • railway tunnel
स्थानठाणे जिल्हा, कोकण विभाग, महाराष्ट्र, भारत
मालक संस्था
चालक कंपनी
लांबी
  • १.३ km
Terminus
Map१९° ०६′ ४२.४८″ N, ७३° ००′ १८.३६″ E
अधिकार नियंत्रण
विकिडाटावर माहिती संपादित करा

पारसिकचा बोगदा महाराष्ट्राच्या ठाणे शहराजवळील पारसिकाच्या डोंगरात केलेला बोगदा आहे. मुंबई कल्याण रेल्वेमार्गाच्या दोन मुख्य मार्गिका यातून जातात. हा बोगदा १.३१७ किमी लांबीचा असून भारतीय रेल्वेवरील एक किमीपेक्षा जास्त लांबीचा हा पहिला बोगदा होता व बांधला गेला तेव्हा आशियातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लांबीचा बोगदा होता. या बोगद्यामुळे मुंबई ते कल्याणमधील अंतर ९.६ किमीने कमी झाले आहे.

पारसिकाच्या डोंगरातून अधिक दोन बोगदे बांधण्याचे नियोजन आहे. यातील एक बोगदा सध्याच्या बोगद्याला समांतर असेल व यातून मालगाड्या धावतील तर दुसरा बोगदा मुंब्रा आणि कळवा रेल्वे स्थानकांच्या मध्ये असेल.[]

इतिहास

[संपादन]

मुंबई जवळील ठाणे आणि मुंब्रा दरम्यान असलेला हा बोगदा हा भारतीय रेल्वेच्या इतिहासातील एक मैलाचा दगड मानला जातो. या बोगद्याचे बांधकाम ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वे (जीआयपीआर) द्वारे १९१३ ते १९१६ या काळात करण्यात आले. हा बोगदा पारसिक टेकडी ओलांडण्यासाठी तयार करण्यात आला होता, ज्यामुळे मध्य रेल्वेवरील मुंबई ते कल्याण दरम्यानचे अंतर कमी झाले. १.३ किलोमीटर लांबीचा हा बोगदा आशियातील तत्कालीन सर्वात लांब बोगद्यांपैकी एक होता.[]

या बोगद्याच्या बांधकामामुळे रेल्वे मार्ग मुंब्रा खाडीच्या वळणावरून जाण्याऐवजी थेट टेकडीखालून काढल्याने प्रवासाचा वेळ कमी झाला. ब्रिटिश स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना असलेल्या या बोगद्याचे बांधकाम कठीण खडकात पूर्णपणे हाताने आणि स्फोटकांचा वापर करून करण्यात आले होते. आजही मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील जलद लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या याच बोगद्यातून धावतात.[]

संदर्भ

[संपादन]
  1. TWO MORE TUNNELS THROUGH PARSIK HILLS
  2. "Parsik Tunnel: A historical marvel", The Free Press Journal, 2021.
  3. "100 years of Parsik Tunnel", Indian Railways Heritage Journal, 2017.