इंटिग्रल कोच कारखाना
Jump to navigation
Jump to search
इंटिग्रल कोच कारखाना (इंग्लिश: Integral Coach Factory, संक्षेप नाव: आय.सी.एफ.) हा भारत देशाच्या चेन्नई शहरामधील रेल्वेचे प्रवासी डबे बनवणारा एक कारखाना आहे. ह्या कारखान्याचे मूळ उद्दिष्ट भारतीय रेल्वेसाठी डबे बनवणे हे असले तरीही आय.सी.एफ.ने आजवर अनेक देशांमधील रेल्वे कंपन्यांसाठी देखील डबे बनवले आहेत. १९९५ साली हा कारखाना स्वित्झर्लंडच्या सहयोगाने चालू करण्यात आला.