तोफ
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |

तोफ म्हणजे मोठी बंदूक किंवा आत स्फोटक दारू भरून बार काढण्याचे यंत्र होय. तोफ हे मध्ययुगीन ते आधुनिक काळातील युद्धांमधील प्रमुख शस्त्र आहे. तोफांमध्ये स्फोटकाचा वापर करून तोफगोळ्याला वेगाने फेकले जाते.

प्रकार[संपादन]
अत्यंत हलक्या तोफेस नरनाळ असे म्हणतात. हलक्या लहान तोफांना रेहकले असेही म्हणतात. तसेच छोटेखानी तोफेस जंबुरा असेही संबोधन आहे. किल्ल्यावरील तोफेचा वापर प्रामुख्याने शत्रूचे आक्रमण थोपवून धरण्याकरिता होत असे. तर भूदलातील तोफेचा वापर आक्रमण करण्यासाठी होत असे.
इतिहास[संपादन]
तोफ वापरल्याचा सर्व प्रथम दाखला चीन मध्ये मिळतो. त्या तोफा हाताने हाताळण्याजोग्या होत्या. त्यात अग्निबाण भरून शत्रूवर सोडले जात असत. पुढे वजनी गोळे वापराचे तंत्र पुढे आले आणि तोफेचे वजनही वाढले. त्यामुळे त्याला चाके लावली गेली. यूरोपात तोफ व तोफांच्या दारूगोळ्याचे ज्ञान तेराव्या शतकात पोहोचले.
स्वरूप[संपादन]
तोफेचे अनेक भाग असतात. त्यातील मागच्या बाजूला असलेला बत्ती देण्याचा भाग सर्वात महत्त्वाचा असतो. तोफ अनेकदा अष्टधातूंपासून बनविलेल्या असत. तोफा लाकडापासूनही बनवल्या जात असत.
महाराष्ट्रातील तोफा[संपादन]
रायगडावरील तोफा
- १) तोफ गंगासागर
- २) तोफ मुलना
- ३) तोफ पेरूजंगी
- ४) तोफ भुजंग
- ५) तोफ रामचंगी
- ६) तोफ पद्मीण
- ७) तोफ फतेलष्कर
- ८) तोफ फतेजंग
- ९) तोफ सुंदर
- १०) तोफ रेकम
- ११) तोफ मुंगसी
- १२) तोफ शिवप्रसाद
- १३) तोफ गणेश
- १४) तोफ लांडा कसाब
- १५) तोफ चांदणी
- १६) तोफ भवानी
- १७) तोफ नागीण
कोरीगड - कोराईगड
- लक्ष्मी तोफ - त्यापैकी सर्वात मोठी - कोराईदेवीच्या मंदिराजवळ आहे.
जंजिरा
- कलाल बांगडी लांब पल्ल्याची तोफ
देवगिरी किल्ला
- अणकुचीदार तोफ
- मुख्य बुरुजावर देखील एक तोफ
नळदुर्ग
- लांब तोफ - उपळ्या बुरुज
- चार तोफा - दारात
- पंचधातूची तोफ आणि असंख्य तोफगोळे - पुरातत्त्व विभागाचे कार्यालय
लोहगड
- तोफ - तुटलेल्या अवस्थेत लक्ष्मीकोठीच्या समोर
- तोफ - ध्वजस्तंभ
आंबोळगड
- तोफ - एकमेव
अंतूर
- एक तोफ
सोनगिर किल्ला
- तोफ - मंदिराच्या दारामध्ये
देवगड
- तोफ - एक
घोसाळगड
- तोफ माचीच्या टोकावर एक
खांदेरी
- तोफ - धक्क्यावर पुरलेली
उदगिर
- बांगडी तोफ १० फूट ३ इंच लांबीची चांदणी बुरुज
- पंचधातूची तोफ ८ फूट ४ इंच लांबीची चांदणी बुरुज
भूदरगड
- तोफ - एक
विजयदुर्ग
- जखीणीची तोफ
विशाळगड
- ८ फुटी तोफ - रणमंडळ’ टेकडी


