जुलै १८
Appearance
(१८ जुलै या पानावरून पुनर्निर्देशित)
जुलै १८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १९९ वा किंवा लीप वर्षात २०० वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]इ.स.पू. चौथे शतक
[संपादन]- ३९० - अलियाची लढाई - गॉल सैन्याने रोमजवळ रोमन सैन्याचा पराभव केला व नंतर रोममध्ये घुसून शहराची नासाडी केली.
पहिले शतक
[संपादन]- ६४ - रोममध्ये प्रचंड आग. जवळजवळ सगळे शहर भस्मसात. यादरम्यान सम्राट निरो लांब उभा राहुन आपले तुणतुणे वाजवत असल्याची कथा.
तेरावे शतक
[संपादन]- १२१६ - ऑनरियस तिसरा पोपपदी.
सोळावे शतक
[संपादन]- १५३६ - इंग्लंडमध्ये पोपची सद्दी संपल्याचा फतवा.
एकोणिसावे शतक
[संपादन]- १८३० - उरुग्वेने आपले पहिले संविधान अंगिकारले.
- १८६३ - अमेरिकन यादवी युद्ध-फोर्ट वॅग्नरची लढाई - श्यामवर्णीय सैनिकांचा युद्धात सर्वप्रथम सहभाग. ५४वी मॅसेच्युसेट्स रेजिमेंटच्या झेंड्याखाली फोर्ट वॅग्नरवरील हल्ला असफल, परंतु या लढाईत श्यामवर्णीय सैनिकांची बहादुरी व धडाडी अमेरिकन लोकांना दिसली.
- १८५२ - इंग्लंडने निवडणुकांत गुप्त मतदान अंगिकारले.
- १८७३ - ऑस्कार दुसरा नॉर्वेच्या राजेपदी.
- १८९८ - मेरी क्युरी व पिएर क्युरीनी पोलोनियम या नवीन मूलतत्त्वाचा शोध लावला.
विसावे शतक
[संपादन]- १९२५ - ऍडोल्फ हिटलरने माइन कॅम्फ हे आत्मकथेसदृश पुस्तक प्रकाशित केले.
- १९४४ - जपानच्या पंतप्रधान हिदेकी तोजोने राजीनामा दिला.
- १९६५ - सोवियेत संघाच्या झॉॅंड ३ या अंतराळयानाचे प्रक्षेपण.
- १९६६ - अमेरिकेच्या जेमिनी १० या अंतराळयानाचे प्रक्षेपण.
- १९६८ - इंटेल कंपनीची स्थापना.
- १९६९ - अमेरिकेन सेनेटर एडवर्ड केनेडीच्या गाडीला अपघात. सहप्रवासी ठार. ही घटना केनेडीच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या महत्त्वाकांक्षेच्या पूर्तीतील प्रमुख अडसर होती.
- १९७६ - ऑलिंपिक खेळात नादिया कोमानेसीने जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत सर्वप्रथम १० पैकी १० गुण मिळवले.
- १९७७ - व्हियेतनामला संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
- १९८२ - प्लान दि सांचेझची कत्तल - ग्वाटेमालात २६८ खेड्यातील लोकांची हत्या.
- १९८४ - सान इसिद्रोची कत्तल - कॅलिफोर्नियातील सान इसिद्रो गावातील मॅकडोनाल्ड रेस्टॉरंट मध्ये २१ लोकांची हत्या. खून्याला पोलिसांनी मारले.
- १९९४ - बोयनोस एर्समध्ये इमारतीत स्फोट. ८५ ठार.
- १९९५ - कॅरिबिअन समुद्रातील मॉंतसेरात द्वीपावरील सुफ्रीयेर ज्वालामुखीचा उद्रेक. राजधानी प्लिमथ उद्ध्वस्त.
- १९९६ - कॅनडात साग्वेने नदीला प्रचंड पूर.
- १९९८ - पापुआ न्यू गिनीत त्सुनामीसदृश समुद्री लाटेत ३,००० व्यक्ती मृत्युमुखी.
एकविसावे शतक
[संपादन]- २००१ - अमेरिकेच्या बाल्टिमोर शहरातील बोगद्यात रेल्वे गाडी रुळांवरून घसरली व पेटली. शहराचा मध्यवर्ती भाग बंद करावा लागला.
- २०१३ - अमेरिकेच्या डेट्रॉइट शहराच्या महानगरपालिकेने २० अब्ज अमेरिकन डॉलर (१२ निखर्व रुपये) इतके कर्ज फेडण्याची क्षमता नसल्याचे जाहीर करून दिवाळे जाहीर केले.
जन्म
[संपादन]- १५५२ - रुडॉल्फ दुसरा, पवित्र रोमन सम्राट.
- १८११ - विल्यम मेकपीस थॅकरे, इंग्लिश लेखक.
- १८४८ - डब्ल्यु.जी. ग्रेस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८९० - फ्रॅंक फोर्ड, ऑस्ट्रेलियाचा १५वा पंतप्रधान.
- १९०९ - आंद्रेइ ग्रोमिको, सोवियेत संघाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९०९ - मोहम्मद दाउद खान, अफगाणिस्तानचा राष्ट्राध्यक्ष.
- १९१८ - नेल्सन मंडेला, दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्राध्यक्ष.
- १९२१ - जॉन ग्लेन, अमेरिकन अंतराळवीर.
- १९४९ - डेनिस लिली, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९५० - सर रिचर्ड ब्रॅन्सन, इंग्लिश उद्योगपती.
- १९६७ - व्हिन डीझेल, अमेरिकन अभिनेता.
- १९८२ - प्रियांका चोप्रा, भारतीय अभिनेत्री.
मृत्यू
[संपादन]- १६२३ - पोप ग्रेगोरी पंधरावा.
- १८६३ - रॉबर्ट गुल्ड शॉ, अमेरिकेच्या ५४वी मॅसेच्युसेट्स रेजिमेंटचा सेनापती.
- १८७२ - बेनितो हुआरेझ, मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष.
- १८९२ - थॉमस कूक, इंग्लिश प्रवास-व्यवस्थापक.
- १९६९ - लोकशाहीर अण्णा भाऊ साठे.
- १९९० - यून बॉसिऑन, दक्षिण कोरियाचा राष्ट्राध्यक्ष.
- २०१२ - राजेश खन्ना, हिंदी चित्रपट अभिनेते.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]- संविधान दिन - उरुग्वे.
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर जुलै १८ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जुलै १६ - जुलै १७ - जुलै १८ - जुलै १९ - जुलै २० - (जुलै महिना)