प्रियांका चोप्रा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
प्रियांका चोप्रा
ᱯᱨᱤᱭᱚᱝᱠᱟ ᱪᱚᱯᱨᱟ
जन्म प्रियांका चोप्रा
१८ जुलै, १९८२ (1982-07-18) (वय: ३९)
जमशेदपूर, झारखंड, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
कार्यक्षेत्र चित्रपट, मॉडेलिंग
भाषा हिंदी
आई मधु चोप्रा
पती निक जोनास
नातेवाईक परिणिती चोप्रा (चुलत बहीण)
अधिकृत संकेतस्थळ http://www.iampriyankachopra.com/

प्रियांका चोप्रा (संताली: ᱯᱨᱤᱭᱚᱝᱠᱟ ᱪᱚᱯᱨᱟ) (जन्म: १८ जुलै १९८२) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री व मॉडेल आहे. मिस वर्ल्ड ही आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा जिंकणारी ती ५ भारतीय महिलांपैकी एक आहे. प्रियांका चोप्राने २००३ साली द हीरो नावाच्या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ती बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन स्वीकारणारी व सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक मानली जाते. प्रियांका चोप्राला दोनदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

जीवन[संपादन]

प्रियांका चोप्राचा जन्म १८ जुलै, १९८२ रोजी जमशेदपूर येथे झाला. प्रियांका चोप्राच्या वडिलांचे नाव अशोक चोप्रा, तर आईचे नाव मधु चोप्रा. प्रियांका चोप्राचे वडील लष्करामध्ये असल्यामुळे त्यांचं कुटुंब नेहमी फिरतीवर असायचं. त्यामुळे प्रियांका चोप्राला पूर्ण भारतीय संस्कृतीची ओळख झाली. प्रियांका चोप्राने आपल्या शिक्षणाची सुरुवात 'ला मार्टीनियर कन्या महाविद्यालय', लखनौ येथे निवासी विद्यार्थी म्हणून केली. त्यानंतर थोड्या कालावधीसाठी तिने 'मारिया गोरेटी महाविद्यालय', बरेलीमधूनही शिक्षण घेतले. प्रियांका चोप्राने दहावीचे शिक्षण बोस्टन, अमेरिका येथून पूर्ण केले. त्यावेळी तिची महत्त्वाकांक्षा सॉफ्टवेअर अभियांत्रिकी किंवा गुन्हेगारी मानसशास्त्रज्ञ होण्याची होती. बोस्टनवरून परतल्यानंतर तिने 'फेमिना मिस इंडिया' स्पर्धेत भाग घेतला व ही स्पर्धा जिंकली. यानंतर प्रियांका चोप्राच्या कारकिर्दीची पूर्ण दिशाच बदलून गेली.

कारकीर्द[संपादन]

फेमिना मिस इंडिया स्पर्धा जिंकल्यानंतर २००० मध्ये प्रियांका चोप्राने विश्वसुंदरीचा किताबही पटकावला आणि ती प्रकाशझोतात आली. त्यानंतर तिने आपला मोर्चा चित्रपटांकडे वळवला. तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले ते तमिळ चित्रपटातून. पण त्यानंतर ती लगेच बॉलीवूडमध्ये आली. हिंदी चित्रपटसृष्टीतला तिचा पहिला चित्रपट होता अनिल शर्मा दिग्दर्शित 'द हीरो'. या चित्रपटामध्ये तिची दुय्यम भूमिका होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फार काही चांगली कामगिरी केली नाही. त्यामुळे तिचे पूर्ण लक्ष त्यानंतर आलेल्या 'अंदाज' या चित्रपटावर होते. या चित्रपटाला परीक्षकांकडून फार चांगली मते मिळाली नाहीत. परंतु, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाल केली. या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कारही मिळाला. यानंतर मात्र प्रियांकाकडे ग्लॅमरस भूमिकांची रांग लागली.

यशाबरोबरच प्रियांका चोप्राला बऱ्याच वादांनाही तोंड द्यावे लागले, आणि त्यावेळी प्रियांका चोप्राने 'राजा भैय्या' आणि 'जान कि बाझी' हे दोन चित्रपट सोडून दिले. तिचे 'प्लॅन' (२००४) आणि 'किस्मत' (२००४) हे सलग दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले. 'असंभव' चित्रपटामध्ये तिची भूमिका केवळ ग्लॅमर वाढवण्यापुरती होती.प्रियांका चोप्रा हि एकमेव अभिनेत्री आहे जिने होल्य्वूड हि आपली अभिनयाची कामगिरी बजावली आहे.

चित्रपट[संपादन]

वर्ष चित्रपट भूमिका टीपा
२००२ तामीझान प्रिया तमिळ चित्रपट
२००३ द हीरो: लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय शाहीन  झंकारिया
अंदाज जिया  सिंघानिया फिल्मफेअर सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार
२००४ प्लॅन राणी
किस्मत सपना गोसावी
असंभव अलिशा
मुझसे शादी करोगी राणी  सिंग
ऐतराज मिसेस.सोनिया रॉय फिल्मफेअर सर्वोत्तम खलनायिका पुरस्कार
२००५ ब्लॅकमेल मिसेस. राठोड
अपुरूपम अपुरूपम तेलुगू चित्रपट
करम शालिनी
वक्त पूजा ठाकूर
यकीन यकीन
बरसात काजल
ब्लफमास्टर! सिम्मी  अहुजा
२००६ टॅक्सी क्र. ९२११ पाहुणी कलाकार पाहुणी कलाकार
३६ चायना टाउन सीमा पाहुणी कलाकार
क्रिश प्रिया
आप की खातिर अनु  खन्ना
डॉन रोमा
२००७ सलाम-ए-इश्क कामिनी  राणावत
बिग ब्रदर आरती  शर्मा
ॐ शांति ॐ स्वतः पाहुणी कलाकार
२००८ माय नेम इज ॲन्थनी गोन्सालविस स्वतः पाहुणी कलाकार
लव्ह स्टोरी २०५० सना बेदी / झिएशा
गॉड तुस्सी ग्रेट हो आलिया  कपूर
चमकू शुभी
द्रोणा सोनिया
फॅशन मेघना  माथूर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार
दोस्ताना नेहा  मेळवाणी
२००९ बिल्लू स्वतः पाहुणी कलाकार
कमीने स्विटी  शेखर  भोपे
व्हॉट्स युवर राशी? व्हॉट्स युवर राशी? एकाच चित्रपटात १२ विविध भूमिका केल्या
२०१० प्यार इम्पॉसिबल! अलिशा  मर्चन्ट
जाने कहां से आयी है स्वतः पाहुणी कलाकार
अंजाना अंजानी कियारा  वासवानी
२०११ ७ खून माफ सुसांना  अण्णा - मेरी  जोहान्स फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री समीक्षक पुरस्कार
रा.वन देशी  गर्ल पाहुणी कलाकार
डॉन २ रोमा
२०१२ अग्नीपथ काळी गावडे
तेरी मेरी कहानी रुखसार  / राधा  / आराधना
बर्फी! झील्मील  चट्टेर्जी
२०१३ जंजीर माला
शूटआऊट  अट  वडाळा बबली  बदमाश
२०१४ गुंडे नंदिता  सेनगुप्ता
मेरी कोम मेरी कोम भारतीय बॉक्सर मेरी कोमच्या जीवनावर आधारित
२०१५ दिल धडकणे दो आयेशा संघ "दिल धडकणे दो"
बाजीराव मस्तानी काशीबाई सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर पुरस्कार
२०१६ जय गंगाजल आभा  माथूर
व्हेंटिलेटर व्हेंटिलेटर मराठी चित्रपट निर्माता; याच देखावा झंझावाती

हे सुद्धा पहा[संपादन]