फेब्रुवारी ८
Appearance
(८ फेब्रुवारी या पानावरून पुनर्निर्देशित)
<< | फेब्रुवारी २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ |
फेब्रुवारी ८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३९ वा किंवा लीप वर्षात ३९ वा दिवस असतो.
ठळक घटना
[संपादन]सोळावे शतक
[संपादन]- १५८७ - मेरी स्टुअर्टला मृत्युदंड.
सतरावे शतक
[संपादन]- १६२२ - इंग्लंडचा राजा जेम्स पहिल्याने संसद बरखास्त केली.
- १६९२ - सेलम, मॅसेच्युसेट्सच्या एक डॉक्टरने जाहीर केले की तीन मुलींच्या अंगात सैतान आहे.
एकोणिसावे शतक
[संपादन]- १८०७ - एलाउची लढाई - नेपोलियनने रशियन सैन्याचा पराभव केला.
- १८४९ - रोमन प्रजासत्ताकची रचना.
- १८९९ - रॅंडचा खून करण्याऱ्या चाफेकर बंधूंची नावे इंग्रज सरकारला सांगणाऱ्या द्रविड बंधूंचा वासुदेव चाफेकर आणि महादेव रानडे यांनी गोळ्या झाडून खून केला.
विसावे शतक
[संपादन]- १९०० - दुसरे बोअर युद्ध - दक्षिण आफ्रिकेत लेडी स्मिथ येथे ब्रिटिश सैन्याचा पराभव.
- १९०४ - रशिया आणि जपान यांचे युद्ध सुरू. या युद्धात जपानने बलाढ्य रशियाची दाणादाण उडवली.
- १९२४ - अमेरिकेतील नेव्हाडा राज्यात विषारी वायुने मृत्युदंड देण्यास सुरू केले.
- १९४३ - दुसरे महायुद्ध-कुर्स्कची लढाई - रशियन सैन्याने कुर्स्क शहर काबीज केले.
- १९४३ - दुसरे महायुद्ध-ग्वादालकॅनालची लढाई - अमेरिकन सैन्याचा जपानी सैन्यावर विजय.
- १९५५ - पाकिस्तानच्या-सिंध प्रांताने जहागीरदारी पद्धत बंद केली व १०,००,००० एकर जमीन कुळांमध्ये वाटुन टाकली.
- १९७१ - नॅस्डॅक शेरबाजार खुले.
- १९७४ - बर्किना फासोत सैनिकी उठाव.
- १९७९ - डेनिस सास्सू-न्ग्वेस्सो कॉॅंगोच्या अध्यक्षपदी.
- १९८४ - सारायेवोत चौदावे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.
- १९८९ - इंडिपेंडंट एरचे बोईंग ७०७ जातीचे विमान एझोर्स बेटावरील सांता मरिया डोंगरावर कोसळले. १४४ ठार.
- १९९४ - अष्टपैलू खेळाडू कपिलदेव निखंज यांनी श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी ४३२ वा बळी नोंदवून न्यू झीलंडचे रिचर्ड हॅडली यांचा सर्वाधिक बळींचा जागतिक विक्रम मागे टाकला.
एकविसावे शतक
[संपादन]- २००० - महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती १९ फेब्रुवारीला साजरी करण्याचा निर्णय केला.
- २००२ - सॉल्ट लेक सिटीत एकोणिसावे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.
जन्म
[संपादन]- ४१२ - प्रोक्लस, ग्रीक तत्त्वज्ञानी.
- १२९१ - आल्फोन्सो चौथा, पोर्तुगालचा राजा.
- १६७७ - जॉक कॅसिनी, फ्रेंच अंतरिक्षशास्त्रज्ञ.
- १७२० - साकुरामाची, जपानी सम्राट.
- १८१९ - जॉन रस्किन, इंग्लिश लेखक.
- १८२० - विल्यम टेकुमेश शेर्मन, अमेरिकन सेनापती.
- १८२८ - जुल्स व्हर्न, फ्रेंच लेखक.
- १८४४ - गोविंद शंकर बापट, मराठी साहित्यिक.
- १८९७ - डॉ. झाकीर हुसेन, शिक्षणतज्ञ, भारताचे तिसरे राष्ट्रपती.
- १९३६ - मनोहर हर्डीकर, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९३९ - सुधीर मोघे, मराठी गीतकार.
- १९४१ - जगजीतसिंह, भारतीय गझलगायक, संगीतकार.
- १९४७ - सॅम गॅनन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९६३ - मोहम्मद अझहरुद्दीन, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९७० - कॅमेरोन कफी, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९७६ - खालेद मशूद, बांगलादेशचा क्रिकेट खेळाडू.
- १९८८ - कीगन मेथ, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
[संपादन]- १२६५ - हुलागु खान, मोंगोल राजा.
- १२९६ - प्रझेमिसल, पोलंडचा राजा.
- १५८७ - मेरी स्टुअर्ट, स्कॉटलंडची राणी.
- १६९६ - इव्हान पाचवा, रशियाचा झार.
- १७२५ - पीटर पहिला, रशियाचा झार.
- १९५७ - जॉन फोन न्यूमन, हंगेरीत जन्मलेला गणितज्ञ, संगणकशास्त्रज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ.
- १९९४ - गोपाळराव देऊसकर, ख्यातनाम चित्रकार.
- १९९५ - भास्करराव सोमण, भारताचे माजी नौदलप्रमुख, व्हाईस ॲडमिरल
- १९९९ - डॉ.इंदुताई पटवर्धन, आनंदग्रामच्या संस्थापिका, ज्येष्ठ समाजसेविका.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर फेब्रुवारी ८ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
फेब्रुवारी ६ - फेब्रुवारी ७ - फेब्रुवारी ८ - फेब्रुवारी ९ - फेब्रुवारी १० - (फेब्रुवारी महिना)