दुसरे बोअर युद्ध
Jump to navigation
Jump to search
दुसरे बोअर युद्ध ब्रिटिश साम्राज्य आणि दक्षिण आफ्रिकेतील दोन बोअर राष्ट्रांमध्ये झालेले युद्ध होते. ११ ऑक्टोबर, १८९९ ते ३१ मे, १९०२ दरम्यान झालेल्या या युद्धात ब्रिटिश साम्राज्याचा विजय झाला. या युद्धात ब्रिटिशांकडून युनायटेड किंग्डम, कॅनडा, भारत, न्यू झीलँड, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाच्या सहा लाख सैनिकांनी भाग घेतला. त्यांच्या विरुद्ध ट्रान्सव्हाल स्टेट आणि ऑरेंज फ्री स्टेट या दोन राष्ट्रांचे ५५,००० सैनिक लढले. या युद्धानंतर फेरीनिखिंगच्या तहानुसार ब्रिटिशांनी बोअर राष्ट्रांवर आधिपत्य मिळवले.
या युद्धाचा भाग असलेल्या स्पीऑन कॉपच्या लढाईमध्ये महात्मा गांधी यांनी ३०० मूळ भारतीय नागरिक आणि ८०० वेठबिगारी भारतीय कामगारांसह रुग्णसेवा केली होती.