नॅसडॅक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नॅस्डॅक या पानावरून पुनर्निर्देशित)
मॅनहॅटनच्या टाईम्स स्क्वेअरमधील नॅसडॅकची इमारत

नॅसडॅक रोखे बाजार (इंग्लिश: NASDAQ; पूर्वीचे संपूर्ण नाव: National Association of Securities Dealers Automated Quotations) हा अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरामधील एक रोखे बाजार आहे. मॅनहॅटनच्या दक्षिण भागात स्थित असलेला हा रोखे बाजार उलाढालीच्या दृष्टीने जगात दुसऱ्या क्रमांकावर (न्यू यॉर्क रोखे बाजाराखालोखाल) सर्वात मोठा असून येथे शेअर्सची देवाणघेवाण करणाऱ्या सर्व कंपन्यांचे एकत्रित बाजार मुल्य ४.४५ निखर्व अमेरिकन डॉलर इतके आहे.

४ फेब्रुवारी, इ.स. १९७१ रोजी सुरुवात झालेला नॅसडॅक हा जगातील पहिला इलेक्ट्रॉनिक शेअर बाजार होता. नॅसडॅक कॉम्पोझिट हा नॅसडॅकवरील सर्व कंपन्यांचा एकत्रित निर्देशांक आहे.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत