Jump to content

जुल्स व्हर्न

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जूल वेर्न
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वफ्रान्स संपादन
स्थानिक भाषेतील नावJules Verne संपादन
जन्म-नावJules Gabriel Verne संपादन
दिलेले नावJules, Gabriel संपादन
आडनावVerne संपादन
जन्म तारीख८ फेब्रुवारी 1828 संपादन
जन्मस्थाननाँत संपादन
मृत्यू तारीख२४ मार्च 1905 संपादन
मृत्यूस्थानआमियां संपादन
मृत्युची पद्धतनैसर्गिक कारणे संपादन
मृत्युचे कारणमधुमेह संपादन
चिरविश्रांतीस्थानCimetière de La Madeleine d'Amiens संपादन
वडीलPierre Verne संपादन
आईSophie Allotte de La Fuye संपादन
भावंडेPaul Verne संपादन
वैवाहिक जोडीदारHonorine du Fraysne de Viane संपादन
अपत्यMichel Verne संपादन
मातृभाषाफ्रेंच भाषा संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाफ्रेंच भाषा, एस्पेरांतो संपादन
लेखनाची भाषाफ्रेंच भाषा संपादन
कार्यक्षेत्रनाटक संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाlycée Georges-Clemenceau, lycée Saint-Stanislas, पॅरिस विद्यापीठ संपादन
निवासस्थाननाँत, पॅरिस, आमियां, Maison de Jules Verne संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1850 संपादन
कार्य कालावधी (अंत)1905 संपादन
धर्मकॅथलिक धर्म संपादन
List of worksJules Verne bibliography संपादन
Has works in the collectionAustralian National Maritime Museum, Memoria Chilena संपादन
सदस्यताAcadémie des sciences, des lettres et des arts d'Amiens, Société de Géographie संपादन
Owner ofQ51768241, Saint-Michel I, Saint-Michel II संपादन
पुरस्कारलीजन ऑफ ऑनरचे अधिकारी, Montyon Prize, नाईट ऑफ द लेजन ऑफ ऑनर, Science Fiction and Fantasy Hall of Fame, Montyon Prize संपादन
येथे उल्लेख आहेFirmament संपादन
Depicted byMonument to Jules Verne संपादन
Copyright status as a creatorcopyrights on works have expired संपादन
Documentation files atSAPA Foundation, Swiss Archive of the Performing Arts संपादन

जूल गाब्रिए वेर्न (मराठी लेखनभेद: ज्युल्स गॅब्रियल व्हर्न ; फ्रेंच: Jules Gabriel Verne ;) (फेब्रुवारी ८ इ.स. १८२८ - मार्च २४ इ.स. १९०५) हे फ्रेंच लेखक होते. एच.जी. वेल्स यांच्याप्रमाणेच त्यांनाही विज्ञान कथेचे जनक मानले जाते. २० व्या शतकातील अनेकानेक शोधांची कल्पना त्यांच्या कथांमध्ये त्यांनी केली होती. त्यात टी. व्ही., ए. सी., इंटरनेट, हेलिकॉप्टर, पाणबुडी, प्रोजेक्टर, पृथ्वीच्या वातावरणाबाहेर जाण्यासाठी यान, ज्युक बॉक्स, इ. कल्पनांचा मोह न आवरल्याने त्या त्या वस्तु प्रत्यक्षात आणल्या गेल्या. विशेष म्हणजे या सर्व गोष्टींच्या कार्य करण्याचे नेमके कारण आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या सर्व प्रश्नांची जूल वेर्न यांनी दिलेली उत्तरे विज्ञानाच्या कसोटीवर खरी उतरणारी होती.

जीवन

[संपादन]

व्हर्न यांचा जन्म पश्चिम फ्रांस मधील लॉयर नदी किनारी असलेल्या नान्ते या गावी फेब्रुवारी ८ इ.स. १८२८ रोजी झाला. त्यांचे वडील पेरी आणि आई सोफी यांच्या पाच मुलांमधील ते सगळ्यात मोठे होते. त्यांनी सुरुवातीचे शिक्षण नाँत गावातील शाळेत घेतले. लहानपणापासूनच व्हर्न यांना प्रवासाची, साहसाची आवड होती. नदीतून जाणाऱ्या लहानमोठ्या नावा पाहून त्यांनाही त्यातून प्रवास करून जग पाहावे असे वाटत होते. या त्यांच्या वेडापायी वयाच्या बाराव्या वर्षी ते एका नावेत लपूनछपून चढले, पण वडिलांना सुगावा लागला आणि व्हर्न पकडले गेले, शिक्षा म्हणून वडिलांनी त्यांना खरपूस चोप दिला. त्यावेळीच लहान व्हर्न यांनी ठरविले की, "यापुढे मी केवळ माझ्या कल्पनेतच जगाची सफर करेन." या घटनेनंतर व्हर्नची रवानगी एका निवासी शाळेत करण्यात आली. या शाळेत व्हर्न मुख्यत्वे लॅटिन भाषा शिकले. प्रतिभावान व्हर्नने थोड्याच दिवसात लॅटिन भाषेत लेख लिहिणे सुरू केले. त्यांचे लेख लोकांच्या पसंतीस उतरू लागले.

शालेय शिक्षणानंतर वडिलांच्या आग्रहाखातर व्हर्नने पॅरिस येथे कायद्याचा अभ्यास सुरू केला, पण लेख लिहिणेही सुरूच ठेवले. या कामामुळे मुलाचे अभ्यासातील लक्ष उडेल या समजुतीने वडिलांनी त्यांची आर्थिक मदत कमी केली. पैसे कमी पडू लागताच व्हर्नने आणखी लेख लिहून ते मासिकांना पाठविणे सुरू केले, त्यामुळे चार पैसेही मिळविता येऊ लागले. तसेच त्यांनी समभाग विक्रीची दलाली करण्याचा व्यवसायही सुरू केला. हा व्यवसाय त्यांना मुळीच आवडत नसे पण यश मात्र मिळत गेले. नियमित प्रसिद्ध होणाऱ्या लेखांमुळे अलेक्सांद्र(अलेक्झांडर) ड्यूमा) आणि व्हिक्टर ह्यूगो सारख्या मोठ्या लेखकांशी परिचय झाला. ड्युमाशी तर कायमची मैत्री जडली. या दोन्ही लेखकांमुळे व्हर्न आपल्या लेख्नन कामाकडे आणखी गांभीर्याने पाहू लागले.

१० जानेवारी, इ.स. १८५७ रोजी व्हर्नने दोन मुले असलेल्या एका विधवा बाईशी विवाह केला. लेख लिहून मिळणारे उत्पन्न पुरेसे होऊ लागले पण मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी व्हर्नने प्रवास वर्णनाची पुस्तके लिहिण्यास सुरुवात केली. प्रवासाची आवड असल्याने इ.स. १८६७ साली व्हर्नने एक छोटी नाव (सें मिशेल) खरेदी केली. पुढे ती नाव विकून त्यांनी दुसरी नाव(सें मिशेल २) खरेदी केली. पुढे तीही नाव विकून (सें मिशेल ३) ही आणखी मोठी नाव खरेदी केली. या नावेतून ते युरोपच्या सफरीवर जात असत. इ.स. १८७० साली उमराव पदावर व्हर्नची नियुक्ती करण्यात आली.

९ मार्च, इ.स. १८८६ रोजी त्यांच्या एका पुतण्याने व्हर्न यांच्यावर पिस्तुलातून दोन गोळ्या चालविल्या. सुदैवाने एक गोळी अन्यत्र गेली पण दुसरी गोळी मात्र व्हर्न यांच्या डाव्या पायाच्या गुडघ्याखाली लागली आणि ते एका पायाने कायम लंगडत चालू लागले.

इ.स. १८८८ साली व्हर्न यांनी राजकारणात प्रवेश केला आणि ते आमियां शहराचे नगरसेवक म्हणून निवडूनही आले. इ.स. १९०५ पर्यंत त्यांनी अविरतपणे नगरसेवक म्हणून काम केले. मार्च २४ इ.स. १९०५ रोजी वयाच्या ७७ व्या वर्षी व्हर्नचे मधुमेहाच्या दीर्घ आजाराने आमियां गावी निधन झाले.

साहित्य

[संपादन]
द लाइटहाऊस अॅट द एंड ऑफ द वर्ल्ड ही व्हर्नच्या साहित्यिक टप्प्यातील सर्वोत्कृष्ट कादंबरी मानली जाते.

ज्युल्स व्हर्न यांनी प्रवास, साहस विषयावर विपुल प्रमाणात लिखाण केले. त्यांनी लिहिलेल्या ५४ पुस्तकांना एकत्रितरित्या अद्वितीय सफरी म्हणून ओळखतात. जर्नी टू द सेंटर ऑफ द अर्थ (इ.स. १८६४), फ्रॉम द अर्थ टू द मून (इ.स. १८८५), ट्वेंटी थाउजंड लीग्ज अंडर द सी (इ.स. १८६९-७०), पॅरिस इन द ट्वेंटिएथ सेंच्युरी, फाइव्ह वीक्स इन अ बलून, अराउंड द मून, अ फ्लोटिंग सिटी, अराउंड द वर्ल्ड इन एटी डेझ ही त्यांची पुस्तके विशेष गाजली आहेत. याशिवाय ज्युल्स यांनी इतर अनेक गोष्टी, निबंध, नाटके आणि कविता लिहिल्या आहेत. त्यांच्या निधनानंतर अगदी २० व्या शतकातही त्यांच्या हस्तलिखितांवरून त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

वारसा

[संपादन]

व्हर्न यांच्या कादंबऱ्यांचा साहित्यिक आणि वैज्ञानिक अशा दोन्ही क्षेत्रांवर मोठा प्रभाव पडला आहे. व्हर्न यांच्यापासून प्रेरणा घेतलेल्या लेखकांमध्ये मार्सेल आयमे, रोलँड बार्थेस, रेने बार्जावेल, मिशेल बुटोर, ब्लेझ सेंड्रार्स, पॉल क्लॉडेल, जॉं कोक्टो, ज्युलिओ कॉर्टझार, फ्रँकोइस मॉरियाक, रिक रिओर्डान, रेमंड रौसेल, क्लॉड रॉय, आँत्वान दि सें-एक्झुपेरी आणि ज्या-पॉल सार्त्र यांचा समावेश होतो. तर व्हर्न यांच्यापासून प्रेरणा घेतलेल्या शास्त्रज्ञ आणि शोधकांमध्ये रिचर्ड ई. बर्ड, युरी गागारिन, सायमन लेक, ह्युबर्ट ल्युटे, गुग्लिएल्मो मार्कोनी, फ्रिट्यॉफ नानसेन, कॉन्स्टँटिन त्सिलकोव्हस्की, वर्नर फोन ब्रॉन आणि जॅक पार्सन्स यांचा समावेश आहे. व्हर्न यांना स्टीमपंक या साहित्यिक आणि सामाजिक चळवळीला प्रेरणा देण्याचे श्रेय दिले जाते, जे १९ व्या शतकातील तंत्रज्ञानावर आधारित विज्ञान कथांना ग्लॅमरस पद्धतीने सादर करते.

रे ब्रॅडबरी यांनी साहित्य आणि विज्ञान जगावर व्हर्न यांच्या प्रभावाचा सारांश असा मांडला आहे: आपण सर्वजण या न त्या प्रकारे जुल्स व्हर्न यांचीच मुले आहोत.

फ्रेंच आरामदायी वाहन निर्माता कंपनी डीएस ऑटोमोबील्स च्या गाड्यांची सर्वोच्च श्रेणी ज्युल व्हर्न आवृत्ती म्हणून ओळखली जाते. फ्रेंच सांस्कृतिक वारसा आणि इतिहासाचा अविभाज्य भाग म्हणून त्यांचा सन्मान करण्यासाठी हे नाव देण्यात आले आहे.[][]

चरित्रे

[संपादन]
  • दुसरा विश्वामित्र (लेखक - संजय कप्तान)

बाह्य दुवे

[संपादन]
  • दनी कायतासारी. ""ल व्होयाज एक्स्ट्राओर्दीनेर" - जुल्स व्हर्न याच्या साहित्यकृतींचे समग्र संकलन" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  • "जुल्स व्हर्न याच्या साहित्यकृती" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "DS N°8 JULES VERNE". www.dsautomobiles.fr (फ्रेंच भाषेत). १५ मार्च २०२६ रोजी पाहिले. Text "Édition Limitée" ignored (सहाय्य); Text "DS Automobiles FR" ignored (सहाय्य)[permanent dead link]
  2. "Collection Jules Verne : Chaque voyage devient extraordinaire" (फ्रेंच भाषेत). Stellantis Media. २७ मे २०२५. १५ मार्च २०२६ रोजी पाहिले.[permanent dead link]