Jump to content

काँकोर्ड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कॉॅंकोर्ड या पानावरून पुनर्निर्देशित)
कॉंकोर्ड

न्यू यॉर्क जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळावर थांबलेले एर फ्रान्सचे कॉंकोर्ड विमान

प्रकार सुपरसॉनिक विमान
उत्पादक देश युनायटेड किंग्डम-फ्रान्स
उत्पादक ब्रिटिश एरक्राफ्ट कॉर्पोरेशन
पहिले उड्डाण २ मार्च १९६९
समावेश २१ जानेवारी १९७६
निवृत्ती २४ ऑक्टोबर २००३
मुख्य उपभोक्ता ब्रिटिश एरवेझ
एर फ्रान्स
नासा
उत्पादन काळ १९६५-१९७९
उत्पादित संख्या २०
प्रति एककी किंमत २३ दशलक्ष पाउंड (१९७७ साली)

कॉंकोर्ड (फ्रेंच: Concorde) हे एक ब्रिटिश-फ्रेंच स्वनातीत (सुपरसॉनिक;ज्याचा कमाल वेग आवाजाच्या वेगापेक्षा जास्त आहे) जेट विमान होते. २,१८० किमी प्रति तास (१,३५० मैल/तास) इतका कमाल वेग असलेले व ९२ ते १२८ आसनक्षमता असलेल्या कॉंकोर्ड विमानाचे सर्वप्रथम उड्डाण १९६९ साली झाले. ब्रिटन व फ्रान्स देशांनी एकत्रितपणे केलेल्या संशोधनाद्वारे ह्या विमानाची रचना ठरवण्यात आली. एकूण केवळ २० कॉंकोर्ड विमाने उत्पदित करण्यात आली व केवळ एर फ्रान्सब्रिटिश एरवेझ ह्या दोन विमान कंपन्यांच्या ताफ्यात कॉंकोर्ड विमाने होती. पॅरिसच्या चार्ल्स दि गॉल विमानतळलंडनच्या हीथ्रो आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून कॉंकोर्ड विमानांद्वारे अमेरिकेच्या जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळडलेस आंतरराष्ट्रीय विमानतळ ह्या विमानतळांसाठी प्रवासी विमानसेवा पुरवली जात असे. हा विमानप्रवास केवळ धनाढ्य प्रवाशांनाच परवडत असे.

२५ जुलै २००० रोजी एर फ्रान्स फ्लाइट ४५९० पॅरिसजवळ कोसळले ज्यामध्ये सर्व १०० प्रवाशांचा मृत्यू झाला. कॉंकोर्डच्या २७ वर्षांच्या इतिहासात हा एकमेव मोठा अपघात होता. ह्यानंतर २००३ साली कॉंकोर्ड विमाने वापरामधून पूर्णपणे काढून टाकण्यात आली.

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]