तेझपूर विमानतळ
Appearance
(सलोनीबारी विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
तेझपूर विमानतळ | |||
---|---|---|---|
भारतीय वायुसेनेचे सुखोई एसयू-३० लढाऊ विमान. | |||
आहसंवि: TEZ – आप्रविको: VETZ | |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सेना/सार्वजनिक | ||
मालक | भारतीय विमानतळ प्राधिकरण | ||
प्रचालक | भारतीय वायुसेना | ||
स्थळ | तेझपूर | ||
समुद्रसपाटीपासून उंची | २४० फू / ७३ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 26°42′44″N 092°47′14″E / 26.71222°N 92.78722°E | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
०५/२३ | ९,०१० | २,७४६ | डांबरी |
तेझपूर विमानतळ भारताच्या आसाम राज्यातील तेजपूर येथे असलेला विमानतळ आहे. येथे वायुसेनेचा तळही आहे. त्याला सलोनीबारी विमानतळ असेही म्हणतात.[१]
तेझपूर वायुसेना तळ भारतीय हवाई दलाचा एक प्रमुख तळ आहे. हा सुखोई एसयू-३० या विमानांचे व मिग-२१ विमानांचे माहेरघरच आहे.[२] या विमानतळाचे स्थानास सामरिकदृष्ट्या फार महत्त्व आहे कारण हा भूतान, तिबेट, चीन,म्यानमार व बांगला देश यांच्या दरम्यान आहे.
इतिहास
[संपादन]ब्रिटिशांनी दुसऱ्या महायुद्धादरम्यान या विमानतळाची बांधणी केली गेली. युद्धानंतर, सन १९५९मध्ये यास हवाई दलाचा तळ म्हणून विकसित करण्यात आले. ईशान्य भारतासाठी हा विमानतळ एक महत्त्वाचा तळ आहे. येथून अनेक प्रकारची विमाने उडू शकतात.
येथून उडालेले पहिले विमान हे व्हॅंपायर व तूफानी १०१ हे होते. विमानतळाचा वापर बहुशः वायुदल करते.
विमानसेवा व गंतव्यस्थान
[संपादन]विमान कंपनी | गंतव्य स्थान . |
---|---|
एर इंडिया रीजनल | कोलकाता |
संदर्भ
[संपादन]- ^ "सलोनीबारी विमानतळ". 4 July 2007 रोजी पाहिले.
- ^ भारत सुखोई-३० विमाने तेझपूर विमानतळावर ठेवणार (इंग्लिश मजकूर)
बाह्य दुवे
[संपादन]- तेझपूर विमानतळ (इंग्लिश मजकूर) Archived 2017-09-02 at the Wayback Machine.
- विमानतळ माहिती VETZ वर्ल्ड एरो डाटा. माहिती अपडेट ऑक्टोबर २००६.