"वसंत पंचमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
आर्या जोशी (चर्चा | योगदान) |
No edit summary |
||
ओळ २: | ओळ २: | ||
[[चित्र:Palas Red.JPG|thumb|200px|right|वसंत ऋतूत [[पळस|पळसाला]] आलेला बहर.]] |
[[चित्र:Palas Red.JPG|thumb|200px|right|वसंत ऋतूत [[पळस|पळसाला]] आलेला बहर.]] |
||
'''वसंत पंचमी''' ही [[शिशिर|शिशिर ऋतूमध्ये]] येणारी [[माघ शुद्ध पंचमी]] होय. भारतात साधारणतः [[मकरसंक्रांत|मकर संक्रांती]]नंतर सूर्याचे उत्तरायण सुरू होतानाच्या काळात येणारा हा सण आहे. भारतात वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होत असला तरी खास करून या दिवशी, नृत्यादि कला शिकवणाऱ्या संस्थांत, विद्येची देवता - [[सरस्वती]]ची पूजा करण्याची प्रथा आहे.<ref name=":0">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=_LCSKv-4HcYC&printsec=frontcover&dq=festivals+of+india&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiTmbG6g77aAhVJro8KHW2_Af0Q6AEIJjAA#v=onepage&q=festivals%20of%20india&f=false|शीर्षक=Fairs and Festivals of India|last=Sharma|first=S. P.|last2=Gupta|first2=Seema|date=2006|publisher=Pustak Mahal|isbn=9788122309515|language=en}}</ref> हा दिवस सरस्वतीचा जन्मदिवस आहे. वसंत पंचमी ही [[कामदेव|कामदेवाच्या]] पूजेसाठीही ओळखली जात असे. |
'''वसंत पंचमी''' ही [[शिशिर|शिशिर ऋतूमध्ये]] येणारी [[माघ शुद्ध पंचमी]] होय. भारतात साधारणतः [[मकरसंक्रांत|मकर संक्रांती]]नंतर सूर्याचे उत्तरायण सुरू होतानाच्या काळात येणारा हा सण आहे. भारतात वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होत असला तरी खास करून या दिवशी, नृत्यादि कला शिकवणाऱ्या संस्थांत, विद्येची देवता - [[सरस्वती]]ची पूजा करण्याची प्रथा आहे. वसंत पंचमीपासून वसंत ऋतू सुरू झाला असे समजले जाते. <ref name=":0">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=_LCSKv-4HcYC&printsec=frontcover&dq=festivals+of+india&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiTmbG6g77aAhVJro8KHW2_Af0Q6AEIJjAA#v=onepage&q=festivals%20of%20india&f=false|शीर्षक=Fairs and Festivals of India|last=Sharma|first=S. P.|last2=Gupta|first2=Seema|date=2006|publisher=Pustak Mahal|isbn=9788122309515|language=en}}</ref> हा दिवस सरस्वतीचा जन्मदिवस आहे. वसंत पंचमी ही [[कामदेव|कामदेवाच्या]] पूजेसाठीही ओळखली जात असे. सुफी परंपरेतील चिश्ती संप्रदायात हजरत निजामुद्दीन अवलियाचे शागीर्द मोहरीच्या पिवळ्या फुलांच्या रंगात बुडविलेली वस्त्रे नेसून हा सण साजरा करतात.मध्ययुगात या दिवशी 'सुवसंतक' नावाचा उत्सव होत असे.<ref>जोशी महादेवशास्त्री ,भारतीय संस्कृती कोश खंड आठवा, पृष्ठ ५२३</ref> |
||
वसंत पंचमीचा कृषी संस्कृतीशी संबंध दिसून येतो<ref name=":0" />. या दिवशी नवान्न इष्टी असा एक छोटा [[यज्ञ]] करतात. शेतात तयार झालेल्या नवीन पिकाच्या लोंब्या घरात आणून त्या देवाला अर्पण करतात. हा दिवस देवी [[सरस्वती]]चा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो. [[मथुरा]], [[वृंदावन]], [[राजस्थान]] या भागात या दिवशी विशेष उत्सव साजरा केला जातो. या दिवशी [[गणपती]], [[इंद्र]], [[शिव]] आणि [[सूर्य]] यांची प्रार्थनाही केली जाते. बंगाल प्रांतात या दिवशी भक्तिगीते म्हणत प्रभातफेरी काढली जाते.<ref>भारतीय संस्कृती कोश खंड आठ </ref><ref>शक्ती गुप्ता , Festivals fairs and fasts of India</ref> |
|||
वसंत पंचमीलाच श्रीपंचमी किंवा ज्ञानपंचमी म्हणतात. |
|||
==पेशवेकालीन उत्सव== |
==पेशवेकालीन उत्सव== |
||
पेशव्यांंच्या काळात हा उत्सव महाराष्टात उत्साहाने साजरा होत असे असा उल्लेख ब्राॅॅटन याने |
पेशव्यांंच्या काळात हा उत्सव महाराष्टात उत्साहाने साजरा होत असे असा उल्लेख ब्राॅॅटन याने केला आहे. या दिवशी स्री-पुरुष आपल्या नातेवाइकांंना फुलांंचा अथवा हिरव्या देठाच्या धान्याच्या कणसांंचा गुच्छ भेट म्हणून देत. डोक्यावरील पागोट्यात तो कणसाचा तुरा रोवत असत. याच दिवशी पिवळ्या रंंगाचे वस्र परिधान करण्याचीही पद्धती होती. फुले,फळे,मिठाई यांंचीही देवाणघेवाण होत असे. वसंंत ॠतूची सन्मानपूर्वक पूजा हा मुख्य भाग असे.<ref>डाॅॅ.कर्णिक शशिकांंत,पेशवेकालीन महाराष्ट्रातील सामाजिक व आर्थिक जीवन,[[इतिहास]] आणि संंस्कृृती,१९८६,पृृष्ठ ७४—७५</ref> |
||
[[बाजीराव पेशवे]] यांंच्या काळात सरदारांंसोबत हा उत्सव साजरा केला जाई. केशरी रंंगाची उधळण केली जात असे. [[ब्राह्मण]],शास्री आणि अन्य सन्माननीय व्यक्तींंना भोजन,कलावंंतीणींंचे नृृत्य असे उत्सवाचे स्वरूप असे. |
[[बाजीराव पेशवे]] यांंच्या काळात सरदारांंसोबत हा उत्सव साजरा केला जाई. केशरी रंंगाची उधळण केली जात असे. [[ब्राह्मण]],शास्री आणि अन्य सन्माननीय व्यक्तींंना भोजन,कलावंंतीणींंचे नृृत्य असे उत्सवाचे स्वरूप असे. |
||
ओळ ३२: | ओळ ३४: | ||
==सुफी संप्रदायात== |
==सुफी संप्रदायात== |
||
लोचन सिंग बक्षी यांच्या मतानुसार,बाराव्या शतकात भारतीय [[सुफी]] [[मुस्लीम]] व्यक्तींनी ह्या हिंदू उत्सवाचा स्वीकार केल्याचे दिसते. चिश्ती संप्रदायानुसार आमीर कुस्रो यांनी एका हिंदू महिलेला या दिवशी पिवळी साडी नेसून मंदिरात गेल्याचे पाहून या संप्रदायाने ही पद्धती स्वीकारली असे मानले जाते.<ref>Lochan Singh Buxi (1994). Prominent Mystic Poets of Punjab: Representative Sufi Poetry in Punjabi, with English Rendering. pp. 49–50. ISBN 978-81-230-0256-9.</ref> |
लोचन सिंग बक्षी यांच्या मतानुसार, बाराव्या शतकात भारतीय [[सुफी]] [[मुस्लीम]] व्यक्तींनी ह्या हिंदू उत्सवाचा स्वीकार केल्याचे दिसते. चिश्ती संप्रदायानुसार आमीर कुस्रो यांनी एका हिंदू महिलेला या दिवशी पिवळी साडी नेसून मंदिरात गेल्याचे पाहून या संप्रदायाने ही पद्धती स्वीकारली असे मानले जाते.<ref>Lochan Singh Buxi (1994). Prominent Mystic Poets of Punjab: Representative Sufi Poetry in Punjabi, with English Rendering. pp. 49–50. ISBN 978-81-230-0256-9.</ref> |
||
==[[शीख]] संप्रदायात== |
==[[शीख]] संप्रदायात== |
२०:३८, ७ मे २०१९ ची आवृत्ती
विशेष लेख |
---|
हा लेख मराठी विकिपीडियावरील १[१]वा लेख आहे. |
वसंत पंचमी ही शिशिर ऋतूमध्ये येणारी माघ शुद्ध पंचमी होय. भारतात साधारणतः मकर संक्रांतीनंतर सूर्याचे उत्तरायण सुरू होतानाच्या काळात येणारा हा सण आहे. भारतात वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होत असला तरी खास करून या दिवशी, नृत्यादि कला शिकवणाऱ्या संस्थांत, विद्येची देवता - सरस्वतीची पूजा करण्याची प्रथा आहे. वसंत पंचमीपासून वसंत ऋतू सुरू झाला असे समजले जाते. [२] हा दिवस सरस्वतीचा जन्मदिवस आहे. वसंत पंचमी ही कामदेवाच्या पूजेसाठीही ओळखली जात असे. सुफी परंपरेतील चिश्ती संप्रदायात हजरत निजामुद्दीन अवलियाचे शागीर्द मोहरीच्या पिवळ्या फुलांच्या रंगात बुडविलेली वस्त्रे नेसून हा सण साजरा करतात.मध्ययुगात या दिवशी 'सुवसंतक' नावाचा उत्सव होत असे.[३]
वसंत पंचमीचा कृषी संस्कृतीशी संबंध दिसून येतो[२]. या दिवशी नवान्न इष्टी असा एक छोटा यज्ञ करतात. शेतात तयार झालेल्या नवीन पिकाच्या लोंब्या घरात आणून त्या देवाला अर्पण करतात. हा दिवस देवी सरस्वतीचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो. मथुरा, वृंदावन, राजस्थान या भागात या दिवशी विशेष उत्सव साजरा केला जातो. या दिवशी गणपती, इंद्र, शिव आणि सूर्य यांची प्रार्थनाही केली जाते. बंगाल प्रांतात या दिवशी भक्तिगीते म्हणत प्रभातफेरी काढली जाते.[४][५]
वसंत पंचमीलाच श्रीपंचमी किंवा ज्ञानपंचमी म्हणतात.
पेशवेकालीन उत्सव
पेशव्यांंच्या काळात हा उत्सव महाराष्टात उत्साहाने साजरा होत असे असा उल्लेख ब्राॅॅटन याने केला आहे. या दिवशी स्री-पुरुष आपल्या नातेवाइकांंना फुलांंचा अथवा हिरव्या देठाच्या धान्याच्या कणसांंचा गुच्छ भेट म्हणून देत. डोक्यावरील पागोट्यात तो कणसाचा तुरा रोवत असत. याच दिवशी पिवळ्या रंंगाचे वस्र परिधान करण्याचीही पद्धती होती. फुले,फळे,मिठाई यांंचीही देवाणघेवाण होत असे. वसंंत ॠतूची सन्मानपूर्वक पूजा हा मुख्य भाग असे.[६]
बाजीराव पेशवे यांंच्या काळात सरदारांंसोबत हा उत्सव साजरा केला जाई. केशरी रंंगाची उधळण केली जात असे. ब्राह्मण,शास्री आणि अन्य सन्माननीय व्यक्तींंना भोजन,कलावंंतीणींंचे नृृत्य असे उत्सवाचे स्वरूप असे. [७]
कुंभमेळा
वसंत पंचमीचा दिवस हा कुंभमेळाप्रसंगी विशेष पवित्र मानला जातो. या दिवशी शाही स्नान कुंभमेळ्यात केले जाते.[८]
सूर्य मंदिर
बिहार राज्यातल्या औरंगाबाद जिल्ह्यातील देव नावाच्या गावामधील सूर्य मंदिरात असलेली देवतेची मूर्ती ही वसंत पंचमीच्या दिवशी स्थापन झाली असे मानले जाते. या दिवशी देवतेला स्नान घातले जाते आणि तिला जुनी वस्त्रे काढून नवी लाल वस्त्रे परिधान केली जातात.भाविक मंडळी या दिवशी गीत, संगीत, नृत्य यांचे सादरीकरण करतात.[९]
प्रेमाचे प्रतीक
प्रेम भावनेचे प्रतीक म्हणून हा दिवस साजरा केला जातो. लोक गुलाबी किंवा पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान करतात.या दिवशी आंब्याची पाने गुंफलेली फुलांची माळ, गजरे इ.घातले जातात.राधाकृष्ण तसेच मदन आणि रती यांच्या प्रेमाची गीते या दिवशी गायली जातात.[१०]
भारताच्या विविध प्रांतात
पश्चिम बंगाल मध्ये या दिवशी सर्वजण पिवळी वस्त्रे परिधान करून सरस्वतीची पूजा करतात. देवीच्या पायाशी पुस्तके व लेखण्या ठेवून देवीचा आशीर्वाद घेतला जातो. काही लोक उपासही करतात. सरस्वतीला फुले वाहिली जातात. त्याला 'पुष्पांजली' असे म्हणतात. यादिवशी लहान मुलांच्या पाटीवर पहिली मुळाक्षरे काढून देऊन त्यांच्या शिक्षणाची सुरुवात केली जाते.
- राजस्थान - पिवळा पोशाख घालून, गोड जेवण करून, पिवळ्या रंगांच्या फुलांनी घराची सजावट करून हा उत्सव साजरा करतात. राजस्थानात मोगऱ्याच्या फुलांच्या माळा गळ्यात घालणे आवश्यक मानले जाते.[११]
पतंग उत्सव
भारतातीलच नव्हे तर फाळणीनंतर पाकिस्तानात गेलेल्या पश्चिम पंजाबात सुद्धा वसंतपंचमी ही पतंगोत्सवाच्या स्वरूपात साजरी केली जाते. शेतातील सरसों(मोहरी)ची फुले पिवळी जर्द झाल्यावर नदीकाठी पंजाबात हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी केशर घातलेला गोड भात खाण्याची पद्धती आहे.[१२] [१३]
सुफी संप्रदायात
लोचन सिंग बक्षी यांच्या मतानुसार, बाराव्या शतकात भारतीय सुफी मुस्लीम व्यक्तींनी ह्या हिंदू उत्सवाचा स्वीकार केल्याचे दिसते. चिश्ती संप्रदायानुसार आमीर कुस्रो यांनी एका हिंदू महिलेला या दिवशी पिवळी साडी नेसून मंदिरात गेल्याचे पाहून या संप्रदायाने ही पद्धती स्वीकारली असे मानले जाते.[१४]
शीख संप्रदायात
वसंत ऋतूचा प्रारंभ म्हणून शीख संप्रदाय हा दिवस उत्सव म्हणून साजरा करतो. गुरुद्वारामध्ये सामाजिक उत्सव म्हणून या दिवसाचे आयोजन करण्याची पद्धती महाराजा रणजीत सिंग यांनी सुरू केली.या उत्सवाचा भाग म्हणून पतंग उत्सव करणे याची सुरुवात अमृतसर मधील हरमंदिर साहिब गुरुद्वारा येथून करण्यात आली.महाराजांच्या दरबारातील विशेष कार्यक्रम या दिवशी होत असे आणि त्या दिवशी त्यांचे मंत्री आणि सैनिक पिवळ्या रंगाचा पोशाख परिधान करीत असत.[१५]
भारताबाहेर
बाली मध्ये हरी राया सरस्वती या नावाने ही उत्सव साजरा होतो. मंदिरे, शिक्षण संस्था, सार्वजनिक ठिकाणे येथे सकाळपासून दुपारपर्यंत प्रार्थना म्हटल्या जातात. नेहमीच्या पोशाखापेक्षा विद्यार्थी व शिक्षक गडद रंगाचे पोशाख परिधान करतात. मंदिरांत आणि देवळांत पक्वान्ने प्रसाद म्हणून दिली जातात.[१६]
चित्रदालन
-
मदन आणि रती
-
मोहरीची फुले
-
सरस्वती पूजा
-
सांवरीची फुले
-
पळसाचे फूल
बाह्यदुवे
संदर्भ आणि नोंदी
- ^ या लेखाचा इतिहास पहा.
- ^ a b Sharma, S. P.; Gupta, Seema (2006). (इंग्रजी भाषेत). Pustak Mahal. ISBN 9788122309515 https://books.google.co.in/books?id=_LCSKv-4HcYC&printsec=frontcover&dq=festivals+of+india&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiTmbG6g77aAhVJro8KHW2_Af0Q6AEIJjAA#v=onepage&q=festivals%20of%20india&f=false. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ जोशी महादेवशास्त्री ,भारतीय संस्कृती कोश खंड आठवा, पृष्ठ ५२३
- ^ भारतीय संस्कृती कोश खंड आठ
- ^ शक्ती गुप्ता , Festivals fairs and fasts of India
- ^ डाॅॅ.कर्णिक शशिकांंत,पेशवेकालीन महाराष्ट्रातील सामाजिक व आर्थिक जीवन,इतिहास आणि संंस्कृृती,१९८६,पृृष्ठ ७४—७५
- ^ डाॅॅ.पाटील रत्नप्रभा,पेशवे आणि मराठे सरदार घराण्यातील स्रियांंचे धार्मिक जीवन,२००७,श्वेता पब्लिकेशन्स,पृृष्ठ ७२
- ^ . १०. २. २०१९ https://hindi.timesnownews.com/india/article/kumbh-shahi-snan-basant-panchami-two-crore-devotees-to-take-a-holy-dip-on-today/362996.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य) - ^ Anirudha Behari Saran; Gaya Pandey (1992). Sun Worship in India: A Study of Deo Sun-Shrine. Northern Book Centre. p. 68. ISBN 978-81-7211-030-7.
- ^ Roy, Christian. Traditional Festivals: A Multicultural Encyclopedia. ABC-CLIO. Vol.2. pp. 192-195. 2005. ISBN 9781576070895 Vema, Manish. Fast and Festivals of India. Diamond Pocket Books. p.72. 2000. ISBN 9788171820764
- ^ Journal of the Indian Anthropological Society, Volume 30 (1995)
- ^ Nikita Desai (2010). A Different Freedom: Kite Flying in Western India; Culture and Tradition. Cambridge Scholars Publishing. pp. 32–34, 60, 99–100, 151. ISBN 978-1-4438-2310-4.
- ^ शक्ती गुप्ता festivals fairs and fasts of India
- ^ Lochan Singh Buxi (1994). Prominent Mystic Poets of Punjab: Representative Sufi Poetry in Punjabi, with English Rendering. pp. 49–50. ISBN 978-81-230-0256-9.
- ^ Hari Ram Gupta (1991). History of the Sikhs: The Sikh lion of Lahore, Maharaja Ranjit Singh, 1799-1839. Munshiram Manoharlal.
- ^ "Bali Cultural Ceremony and Ritual". Balispirit.com. Retrieved 2017-10-08.