"ठाणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
added information खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन |
|||
ओळ ८३: | ओळ ८३: | ||
* [http://www.thanepolice.org ठाणे पोलिस] |
* [http://www.thanepolice.org ठाणे पोलिस] |
||
* [http://thanecity.blogspot.com ठाणे शहराची छायाचित्रे] |
* [http://thanecity.blogspot.com ठाणे शहराची छायाचित्रे] |
||
* ठाणे नगरपालिका ते महानगरपालिका (माहितीपर पुस्तक, लेखक - श्री. वा. नेर्लेकर) |
|||
{{साचा:मुंबई महानगर क्षेत्र}} |
{{साचा:मुंबई महानगर क्षेत्र}} |
२२:२७, ५ मार्च २०१७ ची आवृत्ती
?ठाणे मुंबई • महाराष्ट्र • भारत | |
— उपनगर — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | ठाणे |
लोकसंख्या | १२,६१,५१७ (2001) |
संसदीय मतदारसंघ | ठाणे |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• 400 6xx • +०२२ • MH-04 |
ठाणे हे ठाणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. ठाणे शहराचा कारभार ठाणे महानगरपालिका चालवते. ठाणे हे मुंबईच्या मध्य रेल्वे उपनगरीय व हार्बर मार्गावरील एक स्थानक आहे.
इतिहास
ठाणे हे अतिशय जुने शहर आहे. ह्या शहराचे उल्लेख मध्ययुगीन काळातील शिलालेखात आणि ताम्रपटात सापडतात. हे शहर शिलाहार राजांची राजधानी होती. इटालियन प्रवासी मार्को पोलोने १२९० मध्ये ठाण्याला भेट दिली. ठाणे हे विकसित झालेले सुंदर शहर असल्याचा उल्लेख तो करतो. तसेच ठाणे हे मोठे बंदर असून तेथील व्यापारी कापूस, ताग आणि चामडे विकतात आणि घोडे खरेदी करतात असे तो म्हणतो.
पोर्तुगीज ठाण्यात १५३० मध्ये आले आणि त्यांनी शहरावर १७३९ पर्यंत सुमारे २०० वर्षे राज्य केले. मराठ्यांनी शहरावर १७३९ ते १७८४ राज्य केले. १७८४पासून स्वातंत्र्यापर्यंत शहर इंग्रजांच्या ताब्यात होते. भारतातील पहिली रेल्वे बोरीबंदर (आताचे छत्रपती शिवाजी टर्मिनस) ,मुंबई ते ठाणे दरम्यान १८५३ मध्ये धावली.
ठाणे महानगरपालिका १९८२ साली स्थापन झाली.
भौगोलिक स्थान
ठाणे हे मुंबईच्या उत्तरेकडे वसलेले आहे. ठाण्याचे क्षेत्रफळ १४७ वर्ग कि. मी. आहे. ठाण्याला तळ्यांचे शहर असेही म्हणतात. ठाण्यातला मासुंदा तलाव हा सर्वात सुंदर आहे. ठाणे परिसरात अनेक निसर्गरम्य टेकड्या आणि डोंगर आहेत.
संस्कृती
ठाण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हणतात. गणेशोत्सव आणि नवरात्र हे ठाण्यातील मुख्य उत्सव आहेत. ठाण्यातले गडकरी रंगायतन विविध नाटके आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे माहेरघर आहे. ठाण्यातील राम मारूती रस्ता आणि गोखले रस्ता हे उपहारगृहे , कपडे, पुस्तके, संगणक ह्यांच्या दुकानांसाठी प्रसिद्ध आहेत.
ठाण्यात दही हंडी उत्सव फार उत्साहात साजरा केला जातो. येथे ठाणे शहर, मुंबई व उपनगरातून गोविंदा पथक ह्या उत्सवात सहभाग घेण्यासाठी येतात.
कुंजविहार आणि राजमाता ह्यांचे वडापाव आणि टिप-टॉपचे खाद्यपदार्थ आणि मिठाई विशेष प्रसिद्ध आहेत. 2015 साली 'मेतकूट' नावाचे उपहारग्रृह नौपाडा, घंटाली येथे सुरू झाले. महाराष्ट्राच्या सर्व प्रांतातील ( कोकण, पश्चीम महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश आणि विदर्भ) खाद्यपदार्थ या एकाच ठिकाणी उपलब्ध झाले.
ठाण्यात आता विविध मल्टिप्लेक्स थियेटर्स आणि शॉपिंग मॉल्स आहेत.
वाहतूक व्यवस्था
ठाणे शहरात ठाणे महापालिका परिवहन (टी. एम. टी.) शहर वहातूक व्यवस्था पुरवते. बेस्ट ठाण्याच्या तीन हात नाक्यापासून आणि ठाणे पूर्व स्थानकापासून मुंबईत बससेवा पुरवते. नवी मुंबई परिवहन (एन. एम. एम. टी.) ठाण्यातील चेंदणी नाक्यापासून नवी मुंबईत बससेवा पुरवते. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ (एस. टी.) ठाणे ते बोरिवली, भायंदर, पनवेल ह्या मध्यम पल्ल्याच्या सेवा आणि इतर शहरांसाठी लांब पल्ल्याच्या बससेवा पुरवते.
ठाणे हे मध्य रेल्वेचे मुख्य स्थानक आहे. ठाणे - वाशी ही लोकलसेवा नवीन सुरु झाली आहे.
पर्यटनस्थळे व तीर्थक्षेत्रे
गडकरी रंगायतन, मासुंदा तलाव, राम मारूती रस्ता, येऊर, उपवन, कोपनेश्वर मंदिर, वर्तकनगर साई बाबा मंदिर, घंटाली मंदीर
हे सुद्धा पहा
ठाणे शहर बाह्य दुवे
- ठाणेवेब.कॉम
- ठाणे महानगरपालिका
- ठाणे शहराचे नकाशे
- ठाणे इतिहास
- ठाणे पोलिस
- ठाणे शहराची छायाचित्रे
- ठाणे नगरपालिका ते महानगरपालिका (माहितीपर पुस्तक, लेखक - श्री. वा. नेर्लेकर)
ठाणे जिल्ह्यातील तालुके |
---|
ठाणे तालुका | कल्याण तालुका | मुरबाड तालुका | भिवंडी तालुका | शहापूर तालुका | उल्हासनगर तालुका | अंबरनाथ तालुका |