कल्याण तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?कल्याण तालुका
महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषा मराठी
तहसील कल्याण तालुका
पंचायत समिती कल्याण तालुका

गुणक: 19°14′24″N 73°7′48″E / 19.24000°N 73.13000°E / 19.24000; 73.13000Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

कल्याण तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्याचा एक तालुका आहे.

कल्याण हा ठाणे जिल्ह्यातील एक तालुका आहे. कल्याण शहर हे मुंबई नागरी क्षेत्रातील (urbun agglomeration) एक उपनगर आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका याच तालुक्यात समाविष्ट आहे.

कल्याण शहराचा भूगोल[संपादन]

कल्याण शहर हे उल्हास नदीजवळ वसलेले असून या शहराला ठाणे खाडीवसई खाडी द्वारे अरबी समुद्राशी जोडले गेले आहे. कल्याण शहर मुंबई शहराच्या ४८ किमी ईशान्येला स्थित आहे. मुंबईत वाढणारी प्रचंड गर्दी व तसेच शासनाचे अनुकूल धोरण या सर्व घटनांमुळे ओद्योगिक क्षेत्रे आणि उद्योजक कल्याण शहराकडे प्रचंड आकर्षित होत आहेत.

मुंबई शहरापासून जवळ आणि त्याचप्रमाणे प्रदूषणाची पातळी कमी आहे.

कल्याण जंक्शन हे उपनगरीय वाहतूक आणि त्याचप्रमाणे लांबच्या पल्ल्याच्या लोहमार्ग वाहतूकीसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. छत्रपती शिवाजी टर्मीनस येथून सुरु होणारी मध्य रेल्वेची लाईन कल्याण जंक्शन येथे दोन भागांमध्ये विभाजित होते. कल्याण हून कर्जत आणि कसारा या दोन भागात रेलवे लाइन विभागली गेल्याने कल्याण स्थानकाला फार महत्त्व आहे. कल्याण हे नाव फार पूर्वी पासून आहे. नजीकच्या इतिहासात हे नाव बदलेले गेले नाही. उलट इ.स. १०५० मधे सुध्हा कल्याण हेच नाव प्रचलित असल्याचे पुरावे सापडले आहेत. कल्याण हे नाव शिवरायांच्या बाबतीत " कल्याणच्या सुभेदाराची सुन " या गोष्टीने जोडलेले आहे.

ठाणे जिल्ह्यातील तालुके
ठाणे शहर | कल्याण | मुरबाड | भिवंडी | शहापूर | उल्हासनगर | अंबरनाथ