माहीम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(माहिम या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
माहीम is located in मुंबई
माहीम
माहीम
माहिम

माहीम हा मुंबई शहराचा एक भाग आहे. हे मुंबई शहराचे एक उपनगर आहे. ह्या भागांना मुंबईतील तालुका म्हणतात. माहीम रेल्वे स्थानक हे pSfcim मुंबई उपनगरी रेल्वेवरील शहरातले शेवटचे स्थानक आहे. त्यानंतर मुंबईची वांद्रे आदी उपनगरे सुरू होतात.

इतिहास[संपादन]

मुंबई शहर ज्या सात बेटांनी बनलेले आहे, त्यापैकी एक म्हणजे माहीम. जुने माहीम किंवा महिकावती ही राजा भीमदेवाची राजधानी होती. त्याने तेराव्या शतकात ह्या भागावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आणि एक राजवाडा बांधला. प्रभादेवी येथील एका न्यायालयाचे आणि बाबुलनाथ देवळाचेही बांधकाम त्याच्या कारकिर्दीत झाले. हे जुने माहीम उर्फ केळवा माहीम उर्फ के.माहीम उर्फ महिकावती शहर मुंबईपासून ६० किलोमीटरवर पालघर जवळ आहे. महिकावती देवीचे प्राचीन मंदिर अजूनही तेथे आहे. रामाला आणि लक्ष्मणाला अभिरावण आणि महिरावण या दोघांनी ह्या देवळात बंदी केले होते असा उल्लेख रामायणात आहे, असे म्हणतात. हनुमानाने त्यांची येथून सुटका केली होती. जेव्हा राजा भीमदेव युद्धात पराजित झाला तेव्हा त्याने मुंबई जवळ आपली नवीन राजधानी बनवून तिचेसुद्धा नाव माहीम ठेवले, असे जुन्या माहीमकरांचे म्हणणे आहे.

माहीम हे मुंबईमधील सात बेटांमध्ये मोडत असून येथे कोळी लोकांचे कोळीवाडे आहेत. येथील समुद्र किनाऱ्यावर माहीम कॉजवे (कोळीवाडा), माहीम किल्ला, माहीम रेती बंदर, माहीमची खाडी, सेंट मायकल चर्च (माहीम चर्च), मखदूम शाह बाबा दर्गा, माहीम पोलीस ठाणे आणि त्यांची वसाहत, शिवाजी पार्क, दादर चौपाटी, महापौर निवास, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, शितळादेवी मंदिर, हिंदुजा रुग्णालय, रहेजा रुग्णालय, सेंट झेवियर कॉलेज आणि कापड बाजार (माहीम बाजार) आहेत.

माहीम वांद्रे भागाला माहीमच्या काॅजवेने जोडले आहे.

आगरी पत्रव्यवहार (मुंबई माहीम - १८२९) श्री सभापत्र शके १७५१ मनमथ नाम संवत्सरे वैशाख वद्य १३ रविवार, संमस्त गोतगंगा मीठ आगळे एकवीस पाटील व चोगळे व कुळे समस्त गोतगंगा यामध्यें अर्ज करतो, रामीबाई विठु गोविंद म्हात्रा(म्हात्रे) याची बायको ही अर्ज करतो, मी हेल घेऊन माहीमास(माहीम) गेलो होतो तर तेथें चार घटका जाले. रात्र समय आठ वाजले म्हणोन दिसत नाहीं तर तिचे बापानी घराची भारतर पो नागू मराठा व बालू मराठा हे दोघे धनी पो तर ते माहिमा(माहीम) जागून सोधून गाडी करू येत होते. की गाडी लौकर येईल म्हणोन गाडी केली ती गाडी रो दाही तेथें दुस्ती जाली. मग मी म्हणलुं की मज रात्र झाली. ये दोघे धनी नेवावयास आले तर आम्हांस सोरऊन दिली. म्हणून माझ्या बइठकी दोन वेळा केल्या कीं तूं गारीन बसलीस. म्हणोन नवऱ्यानं टाकून दिली तर मजला कासी गंगेची आगत्य लागली. म्हणोन भवताई मिळविली. तर कासी गंगेनें विचार केला कीं, रामी बाईचे पदरीं कांही दोस नाहीं. म्हणोन कासी गंगेनें पंक्ति पावन केले. जाती मिळती केली व रामी बाईंनें पाट लावला होता तो कासी गंगेनें माफ केला. सर्वे जे केले ते कासी गोताचे अनुमतें झाले. तर गोताचा जेवान खर्च मिळूल घेतले रूपये २०. बाई रामीस पंक्ति पावन केले. मागें मोरें कोनी देजा विसी निघाला तर कासी गोत जबाब देईल. हे लिहून दिले

  सही /- हस्तअक्षर धर्मा हास म्हात्रे मु॥ मुंबई, मीठ आगळे.

हें पत्र लिहून माहूलकर पाटील यास पे॥ तर तुम्ही मान्य करने हरकत कोणाचे ऐकोन न करने. हे सभापत्र लिहून दिले

सही /- (२४ इसमांच्य सह्या)

[[१]] [[(सं द र्भ ग्रं थ – बॉं. गॅ. पु.१३, भा. १. सेन्सन रिपोर्ट १९११, पु. ७. आगरी-ज्ञाति- परिषदेच्या सेक्रेटरीकडून व आगळे-ज्ञातिहितवर्धक मंडळाच्या अध्यक्षाकडून आलेली माहिती ( ज्ञानकोशकारांनीं सर्व जातींनां आपआपली माहिती सविस्तर पुरविण्याविषयी विनंती केली होती तदनुसार या ज्ञातीनें आपल्या सभा भरवून एकमतानें जी माहिती पाठविली तिचा येथें उपयोग केला आहे ). आगळे ज्ञातीच्या वद्दिवाटीचे नियम. वि. विस्तार पु. ४३. टॅन्झॅक्शन्स बॉ. जिऑ. सोसायटी.१९४.)]]

प्रेक्षणीय स्थळे[संपादन]

माहीम येथील प्रेक्षणीय स्थळांमध्ये जुन्या वास्तुशैलीत असणारे मुंबईतील सर्वात जुने शितळादेवीचे मंदिर अंदाजे सन १५३४ मध्ये पोर्तुगीजांनी बांधले. माहीमध्ये सेंट मायकल चर्च नावाचे एक कॅथॉलिक चर्च आहे, माहीम चर्च म्हणून ते ओळखले जाते. माहीममध्ये बाबा मखदूम शाह दर्गा (माहीमचा दर्गा) आहे हे तिन्ही प्रार्थनास्थळे एका त्रिकोणाच्या टोकांवर येतात. माहीम कॉजवेच्या जवळ स्वामी विवेकानंद उद्यान आहे. संयुक्त महाराष्ट्र कलादालन आणि महात्मा गांधी राष्ट्रीय जलतरण तलाव येथेच आहे, आणि त्याचबरोबर मनमाला देवीचे मंदिर आहे. ज्याला माहीम निसर्ग उद्यान या नावाने ओळखले जाते, ते महाराष्ट्र निसर्ग उद्यान धारावी-शींव (सायन) येथे माहीमच्या पूर्वेला आहे.

प्रसिद्ध लोकवस्ती[संपादन]

वीर सावरकर मार्ग, 

माहीम चर्च)]]

शितळादेवी मंदिर,

सिटी लाईट सिनेमा,

माहीम कॉजवे कोळीवाडा,

सागर सानिध्य चाळ,

माहीम मच्छिमार वसाहत,

माहीम पोलीस वसाहत,

मोहंमद छोटानी मार्ग,

मोगल लेन,

भांडार गल्ली,

मोठा दर्गा,

छोटा दर्गा,

मोरी रोड,

नथुसेठ वाडी,

कापड बाजार (माहीम बाजार),

|मखदूम शाह बाबा दर्गा : माहीमचा दर्गा (मोठा दर्गा)

माहीमचा किल्ला

माहीम चर्च

भागोजी कीर मार्ग,

टायकल वाडी,

हे सुद्धा पहा[संपादन]