मुरबाड तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?मुरबाड तालुका
महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषा मराठी
तहसील मुरबाड तालुका
पंचायत समिती मुरबाड तालुका
कोड
पिन कोड

• ४२१४०१

गुणक: 19°20′26″N 73°44′33″E / 19.340636°N 73.742526°E / 19.340636; 73.742526


मुरबाड तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्याचा एक तालुका आहे.

  • 'कल्याण' पासून 'टोकावडे' गावापर्यंत हा तालुका पसरला आहे. तालुक्यात प्रामुख्याने मराठा, कुणबी, आगरी, आदिवासी व ठाकुर समाजाची वस्ती आहे. अहमदनगर - मुंबई महामार्गावर गावे पसरलेली आहेत. पर्यटकप्रिय असलेला 'माळशेज घाट' याच तालुक्यामध्ये येतो. मुंबई व जवळपासच्या ठिकाणांहून छोट्या सहलींसाठी बरेच पर्यटक या परिसरात येतात.
  • सह्याद्री डोंगर रांगांमध्ये आजोबाचा पर्वत (डोंगर ) हे स्थळ  देवस्थान आणि पर्यटन स्थळ म्हणून विशेष प्रसिद्ध आहे. तालुक्याचे शेवटचे गाव वेळूक आणि आळवे  येथून आपल्याला आजोबाच्या पर्वतावर जाण्यास मार्ग आहे .
  • मुरबाड तालुका हा निसर्गाने नटलेला असा तालुका आहे. या तालुक्यातील अनेक गावे ही डोंगराळ भागात मोडतात. मुरबाड परिसरात आज अनेक बंगलो प्रोजेक्ट आले आहेत . त्याच सोबत अनेक गृह प्रकल्प, उद्योग व्यवसाय येत आहेत. मात्र यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास व्हायला नको याची काळजी सर्वानी घ्यायला हवी .
  •   मुरबाड तालुक्यातील काळू नदी आणि शाई नदीवर धरण बांधण्याचे  नियोजन आहे . मात्र शासन आणि राजकारणी यांच्या चुकीच्या धोरणामुळे येथील स्थानिक बेघर आणि बेरोजगार होणार आहेत . स्थानिकांसाठी शासनाची कोणतीही ठोस योजना नसल्याने या दोन्ही धारणांसाठी स्थानिकांचा प्रखर विरोध आहे. आज या दोन्ही धरणांचे  काम बंद पडले आहे. स्थानिकांच्या एकजुटीचा विजय झाला आहे . 
  • मुरबाडची MIDC विशेष प्रसिद्ध होती. मात्र सोयीसुविधांच्या अभावामुळे, प्रशिक्षित कामगारांचा तुटवडा आणि उद्योगांचे स्थलांतर यामुळे आज MIDC चे चित्र काळवंडले आहे . 


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
ठाणे जिल्ह्यातील तालुके
ठाणे शहर | कल्याण | मुरबाड | भिवंडी | शहापूर | उल्हासनगर | अंबरनाथ