Jump to content

ताग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ताग (इंग्रजी:Jute) ही वनस्पती ‘फ्लोएम’ पेशीपासून माणसाला उपयुक्त असे तंतू देणारी वनस्पती आहे. वनस्पतीजन्य धागेनिर्मिती हे हरित तंत्रज्ञान आहे. भाताची लागवड करताना पाण्याच्या साठवणीसाठी बांध घालावे लागतात. या बांधांवर ताग लावण्यात येतो. तागाचा दोन प्रकारे उपयोग होतो. फ्लोएमपासून धागा मिळवणे आणि त्याच्या मुळांवरील गाठी नत्रस्थिरीकरण्यास मदत करतात. म्हणूनच कमी पाऊस-पाण्यात उत्कृष्ट धागा देणाऱ्या या वनस्पतींच्या लागवडी पर्यावरण रक्षणास पूरक आहेत.

प्रक्रिया

[संपादन]

सूक्ष्म जिवाणूंच्या साहाय्याने तंतुमय वनस्पतींना पाण्यात कुजवून त्यापासून धागे तयार करण्याची नैसर्गिक प्रक्रियेला ‘रेटिंग’ म्हणतात. या क्रियेत घायपात, अंबाडी, ज्यूट या वनस्पतींच्या खोडांना साठविलेल्या स्वच्छ पाण्यात तीन ते चार आठवडे ठेवून नंतर सूर्यप्रकाशामध्ये सुकविले जाते आणि नंतर त्यांचे गठ्ठे बांधून ज्यूट गिरणीमध्ये दोर, दोरखंड सुतळी, गोणपाट, धान्याची पोती तयार करण्यासाठी पाठवले जाते. ज्यूटच्या धाग्यांना विविध प्रकारचे रंग देऊन त्यापासून शबनम बॅग, आसने, शिंकाळी, पर्सेस अशा शोभेच्या वस्तू गृहउद्योगातून तयार केल्या जातात.

रेटिंग हा कृषी क्षेत्रातील पूरक व्यवसाय आहे. फ्लोएमपासून तयार केलेल्या धाग्यांना वैज्ञानिक भाषेत ‘बास्ट फायबर’ असेही म्हणतात. हा धागा कणखर, सहजासहजी न तुटणारा आणि लवचीक असतो. उत्कृष्ट प्रक्रिया केलेले तंतू पांढरेशुभ्र असतात.

पूर्व बंगालमधील ज्यूट शेती

[संपादन]

भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळात बंगालमध्ये ज्यूट उत्पादन आणि त्यावरील प्रक्रिया उद्योग चालत असे. फाळणीनंतर ज्यूट शेती पूर्व बंगाल, सध्याच्या बांगलादेशमध्ये गेली आणि ज्यूटच्या गिरण्या पश्चिम बंगालमधील कलकत्ता तेथे राहिल्या. याचा फार मोठा फटका लाखो ज्यूट उत्पादक शेतकऱ्यांना बसला.

पूर्वी हूगळी आणि ब्रह्मपुत्रेच्या नदी काठावर नद्यांचे पाणी अडवून मोठ्या प्रमाणावर ज्यूटच्या धाग्यांची निर्मिती होत असे. प्रदूषित नद्या, वातावरणातील बदलामुळे येणारे महापूर यामुळे या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आणि पर्याय म्हणून प्लास्टिकची पोती, दोर, दोरखंड बाजारात आले.

अन्य शब्द

[संपादन]
  • संस्कृत : शण, घंटालक
  • मराठी : सण, तागी
  • हिंदी : जंजानिया, मिठापात, पात, तिटापात, नार्चा
  • बंगाली : मिष्टापात, जंजानिया
  • तमिळ : ओलीभांजी, वेट्टाकिल
  • शास्त्रीय नाव : Corchorus capasularis; Corchorus olitorius
  • इंग्रजी : ज्यूट, White Jute

संदर्भ

[संपादन]