कुर्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Kurla
कुर्ला
उपनगर

Kurla Station (2).jpg
कुर्ला रेल्वे स्थानक

गुणक: 19.06°N 72.89°E / 19.06°N 72.89°E / 19.06; 72.89गुणक: 19.06°N 72.89°E / 19.06°N 72.89°E / 19.06; 72.89

देश भारत ध्वज भारत
राज्य महाराष्ट्र
जिल्हा मुंबई उपनगर


कुर्ला is located in मुंबई
कुर्ला
कुर्ला
कुर्ला
कुर्ल्यामधील फीनिक्स मार्केट सिटी मॉल

कुर्ला ( इंग्रजीत Coorla/Kurla; पोर्तुगीजमध्ये Corlem) हे मुंबई शहराचे एक विस्ताराने मोठे असे उपनगर आहे. हे मुंबई उपनगर जिल्ह्यातील कुर्ला तालुक्याचे मुख्यालय आहे. या जागेचे नाव ईस्ट इंडियन गावाच्या नावावरून ठेवले आहे[ संदर्भ हवा ] . हे क्षेत्र मुंबई महानगर पालिकेच्या 'एल' वॉर्ड मध्ये येते.मिठी नदीच्या काठावर व मुंबई-आग्रा रोडवर लाल बहादूर शास्त्री मार्गावर आहे. कुर्ला रेल्वे स्थानक मुंबईतील सर्वात वर्दळीचे रेल्वे स्टेशन म्हणून गणले जाते. मुंबईतून बाहेर पडणाऱ्या गाड्या ज्या ज्या टर्मिनसवरून मिघतात त्यांपैकी कुर्ला टर्मिनस हे एक महत्त्वाचे टर्मिनस आहे.ते कुर्ल्याजवळच्या टिळकनगर या स्थानकाजवळ असल्याने कुर्ला टर्मिनसचे नाव बदलून लोकमान्य टिळक टर्मिनस करण्यात आले. बांद्रा आणि कुर्ला यांच्या दरम्यान वांद्रे कुर्ला संकुल हे मुंबईमधील मोठे वाणिज्य केंद्र आहे. मुंबई विमानतळ (छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ) कुर्ल्याच्या उत्तरेस आहे.

कुर्ल्यातील शिक्षणसंस्था[संपादन]

शाळा[संपादन]

 • अंजुमान इस्लाम अल्लाना शाळा व कनिष्ठ महाविद्यालय,
 • अंजुमान खैरूळ इस्लाम उर्दू हायस्कूल
 • अंजुमान ताब्लिगुल इस्लाम उर्दू हायस्कूल
 • अल-बरकत - इंग्रजी माध्यम
 • इकरा इंटरनॅशनल स्कूल
 • ईडन ज्युनियर कॉलेज - सफेद पूल
 • उर्दू महापालिका शाळा, मुफ्ती आझम चौक; रझा नगर.
 • एम ई एस उर्दू हायस्कूल
 • कार्तिक हायस्कूल - इंग्रजी माध्यम
 • शैक्षणिक संस्थेची शाळा - कुर्ला हायस्कूल (मराठी माध्यम)
 • के एम एस पी मंडळाचे हायस्कूल- मराठी माध्यम
 • केदारनाथ विद्या प्रसारणी (केव्हीपी) - इंग्लिश स्कूल
 • कोहिनूर इंटरनॅशनल स्कूल
 • कोहिनूर बिझनेस मॅनेजमेंट
 • गणेश बाग महापालिका शाळा (मराठी, हिंदी, इंग्रजी माध्यम)
 • गांधी बाल मंदिर हायस्कूल - मराठी माध्यम
 • श्री गुजराती समाज विद्यालय
 • ग्रीन मुंबई उर्दू हायस्कूल, मुफ्ती आझम चौक.
 • ग्रीन मुंबई हायस्कूल, रझा (कुरेशी) नगर.
 • दारूल-ऊलूम घौसिया झिऑल कुराण
 • नरिमन लेन महापालिका उर्दू शाळा
 • नेहरूनगर पालिका शाळा, कुर्ला - पूर्व
 • इंडियन एजुकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल
 • मदरसा असलफिया अरबी शाळा
 • मदरसा दुरूल उलूम, मेहबूब ई शोभनी अरबी शाळा
 • मायकेल हायस्कूल, कुर्ला
 • मुंबई उत्कल इंग्लिश स्कूल
 • भारत एज्युकेशन सोसायटीचे विवेक इंग्लिश स्कूल (कुर्ला पूर्व)
 • शांताराम कृष्णाजी पंतवळवळकर हायस्कूल - मराठी व इंग्रजी (पूर्वी न्यू इंग्लिश स्कूल म्हणून ओळखले जाते)
 • शिवाजी विद्यालय
 • शिशु विकास मंदिर हायस्कूल - मराठी माध्यम
 • शिशु विहार कुर्ला-पश्चिम
 • संत गाडगे महाराज विद्यालय-कुर्ला पश्चिम
 • सिद्दीकी इंग्लिश स्कूल कुरेशी नगर
 • सेंट जोसेफ हायस्कूल
 • सेंट यहूदा हायस्कूल, जरीमरी
 • स्वामी दयानंद विद्यालय हायस्कूल
 • स्वामी विवेकानंद हायस्कूल व कॉलेज
 • होली क्रॉस हायस्कूल, कुर्ला

महाविद्यालये[संपादन]

डॉन बॉस्को इंजिनिअरिंग कॉलेज

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत