मुंबई महानगर क्षेत्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मुंबई महानगर क्षेत्र विस्तार
राज्य महाराष्ट्र
जिल्हे मुंबई शहर
मुंबई उपनगर जिल्हा
ठाणे जिल्हा
रायगड जिल्हा
आयुक्त
रत्नाकर गायकवाड
क्षेत्रफळ ४,३५५ km²
लोकसंख्या (२००१ साली) १७,७०२,७६१
घनता (२००१ साली) ४,०६५/km²
टपाल संकेतांक ४०० ०xx to ४०० ९xx
दूरध्वनी संकेतांक ०२२, ०२५x
वाहन संकेतांक MH-०१, MH-०२, MH-०३, MH-०४,MH-०५,MH-०६,MH-४३
प्रमाणवेळ IST (यूटीसी+५:३०)

मुंबई महानगर क्षेत्र (MMR) मुंबई महानगर आणि त्याच्या उपनगरांनी मिळून बनलेले आहे.याची उपनगरे गेल्या २० वर्षांत विकसित झालेली आहेत.येथे ७ नगर पालिका तर १५ नगर परिषदा आहेत. या पूर्ण क्षेत्रातील योजना,विकास,वाहतूक व कारभार हा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) द्वारे पहिला जातो.या परिसराचे एकूण क्षेत्रफळ ४३५५ वर्ग कि.मी. आणि लोकसंख्या १७,७०२,७६१ आहे. [१] हा मुंबई शहराशी मुंबई उपनगरी रेल्वे सेवेने जोडले गेले आहे.

मुंबई महानगर क्षेत्रातील नगरपालिका लोकसंख्या (२००१) क्षेत्रफळ (km²) घनता (प्रति km²)
मुंबई नगर पालिका ११,९७८,४५० ४३७.७१ २७,३६६
ठाणे नगर पालिका १,२६२,५५१ १२८.२३ ९,८४६
नवी मुंबई नगर पालिका ७०४,००२ १६३ ४,३१९
कल्याण-डोबिंवली नगर पालिका १,१९३,५१२ १३७.१५ ८,७०२
उल्हासनगर नगर पालिका ४७३,७३१ २७.५४ १६,२०१
मीरा-भाईंदर नगर पालिका ५२०,३८८ ८८.७५ ५,८६३
भिवंडी-निज़ामपूर नगर पालिका ५९८,७४१ २८.३१ २१,१४९
एकूण १६,७३१,३७५ १०१०.६९ १६,५५४
नगर परिषद
 1. अलिबाग
 2. अंबरनाथ
 3. कर्जत
 4. खोपोली
 5. कुळगांव बदलापूर
 6. माथेरान
 7. नाला सोपारा
 8. नवघर-माणिकपूर
 9. पनवेल
 10. पेण
 11. उरण
 12. वसई
 13. विरार

मुंबई महानगर क्षेत्राच्या अंतर्गत महाराष्ट्रातील ४ जिल्हे येतात.

 1. मुंबई शहर (पूर्णं)
 2. मुंबई उपनगर (पूर्णं)
 3. ठाणे (अंशतः)
 4. रायगड (अंशतः)

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]