ताडदेव
Jump to navigation
Jump to search

हाजी अली दर्गा येथुन दिसणारे ताडदेव परिसर
ताडदेव (Tardeo) हा मुंबई शहरातील दक्षिणेकडील एक भाग आहे. साधारणपणे नाना चौक ते हाजी अलीपर्यंत व्याप्ती असलेला हा भाग मुंबईतील सगळ्यात जुन्या वस्त्यांपैकी एक आहे. येथील ताडदेव रस्ता मुंबईतील प्रमुख हमरस्त्यांपैकी एक आहे. याचे प्रचलित नाव बदलून ते जावजी दादाजी रस्ता (नाना चौक ते ताडदेव सर्कल) आणि पंडित मदन मोहन मालवीय रस्ता (ताडदेव सर्कल ते हाजी अली जंक्शन) असे करण्यात आलेले आहे. या भागाला ४०० ००७ (ग्रॅंट रोड टपाल कार्यालय) आणि ४०० ०३४ (तुळशीवाडी टपाल कार्यालय) अशी दोन पिन कोडे आहेत.