ऐरोली
ऐरोली | |
भारतामधील शहर | |
देश | भारत |
राज्य | महाराष्ट्र |
जिल्हा | ठाणे |
लोकसंख्या | |
- शहर | २.०८ लाख |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाणवेळ |
ऐरोली हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नवी मुंबईचा निवासी व व्यावसायिक परिसर आहे. हा मुंबई महानगर प्रदेशाचा एक भाग असून नवी मुंबई महानगरपालिका प्रशासित आहे. मुलुंडला ते मुलुंड ऐरोली पूलमार्गे, ठाणे ते कळवा पूल व उर्वरित नवी मुंबईमार्गे ठाणे बेलापूर महामार्गाशी जोडले गेले आहे. ऐरोलीमध्ये सेक्टरनिहाय भौगोलिक विभाग आहे (सेक्टर -१, सेक्टर -२ आणि इतर सेक्टर इ.). राज्य सरकारने ऐरोली- मुलुंड पुलाच्या खाडीच्या बाजूला फ्लेमिंगो पक्षी अभयारण्य विकसित केले आहे. रहाजाने 3.3 दशलक्ष चौरस फूट, आयटी एसईझेड कॅम्पस, माइंड स्पेस विकसित केले आहे.ऐरोली हे महाराष्ट्रातील नवी मुंबई शहराचे एक नगर (नोड) आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत असलेले ऐरोली मुंबई महानगर क्षेत्राचा भाग आहे. १९९९ साली बांधला गेलेला ऐरोली पूल पूर्व दृतगती महामार्गाला ठाणे बेलापूर रस्त्यासोबत जोडतो. हा पूल नवी मुंबईतील दोन पुलापैकी एक असून, दुसरा वाशी पुल आहे. ऐरोली व दिवा गाव हे सिडको द्वारा विकसित केले गेले व त्यानंतर एन.एम.एम.सी.ला हस्तांतरित केले गेले आहे. ऐरोली हे २८ (सेक्टर) क्षेत्रात विभागले गेले असून त्यातील २० क्षेत्र विकसित आहेत.यामध्ये विविध कंपन्या आहेत.
वाहतूक :-
[संपादन]- रेल्वे: ऐरोली रेल्वे स्थानक मध्य रेल्वे (हार्बर) उपनगरीय मार्गावरील एक स्थानक आहे. ठाणे - वाशी/ पनवेल/ नेरुळ लोकलने ऐरोलीला जाणे सोयीचे आहे. ठाणे ते ऐरोली ५-७ मिनिटाचे अंतर आहे. ऐरोली रेल्वे स्थानक सेक्टर ३ला आहे.
- बस: बेस्ट बस ही ऐरोली ते वाशी, चेम्बूर, शीव, मुलुंड, भांडूप, पवई, दिंडोशी व बोरिवली पर्यंत आहे. एन.एम.एम.टी. बस ही ऐरोली ते वाशी, ठाणे, पनवेल, भायंदर, मुलुंड व बोरिवली पर्यंत आहे. बेस्ट व एन.एम.एम.टी.च्या ए.सी. बसेस ऐरोली ते वाशी, दिंडोशी व बोरिवली पर्यंत आहेत. ऐरोली बस डेपो सेक्टर ३ला आहे.
शाळा :-
[संपादन]- न्यु होराईझन पब्लिक स्कूल, सेक्टर १९ (सी.बी.एस.ई)
- डी.ए.व्ही. पब्लिक स्कूल, सेक्टर १० (सी.बी.एस.ई)
- संत. झेव्हिअर'स हायस्कूल, सेक्टर ६ (एस.एस.सी.)
- न्यु होराईझन स्कॉलरस स्कूल, सेक्टर १३ (सी.बी.एस.ई)
- युरो स्कूल, सेक्टर १९ (आय.सी.एस.ई)
- ज्ञानदिप विद्यालय, सेक्टर २ (एस.एस.सी.)
- श्रीमति राधिकाबाई मेघे विद्यालय, सेक्टर १६ (एस.एस.सी.)
- सरस्वति विद्यालय, सेक्टर २ (एस.एस.सी.)
- श्रीमति सुशिलादेवी देशमुख विद्यालय व ज्यु.कॉलेज, सेक्टर ४ (एस.एस.सी.)
- श्रीराम विद्यालय व ज्यु.कॉलेज, सेक्टर ३ (एस.एस.सी.)
कॉलेजेस:-
- दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालय
- जनम विकास मंडळाचे मेहता पदवी कला व वाणिज्य महाविद्यालय
दवाखाने
[संपादन]- नॅशनल बर्न सेंटर सेक्टर १३