घोडबंदर रोड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
घोडबंदर रोड

राज्य महामार्ग ४२ किंवा घोडबंदर रोड हा महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यामधील एक प्रमुख व वर्दळीचा रस्ता आहे. २० किमी लांबीचा हा रस्ता मुंबई महानगर क्षेत्रामधील एक महत्त्वाचा दुवा आहे.

ठाणे शहरामध्ये कापूरबावडी जंक्शनपाशी पूर्व द्रुतगती महामार्गापासून घोडबंदर रस्त्याची सुरूवात होते. तेथून साधारण उत्तर व पश्चिम दिशेस धावून हा रस्ता घोडबंदरापाशी पश्चिम द्रुतगती महामार्गाला मिळतो.