वाळकेश्वर
Jump to navigation
Jump to search
वाळकेश्वर हा मुंबई शहरामधील एक उच्चभ्रू भाग आहे. दक्षिण मुंबईमध्ये मलबार हिल भागात मरीन ड्राइव्हच्या वायव्य टोकाला उभे असलेले वाळकेश्वर येथील वाळकेश्वर मंदिर, बाणगंगा तलाव इत्यादी ऐतिहासिक स्थळांकरिता प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालांचे अधिकृत निवास राज भवन येथेच आहे.