वज्रेश्वरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
वज्रेश्वरी मंदिर

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी हे गाव गरम पाण्याच्या आरोग्यवर्धक कुंडांमुळे महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांमधील महत्त्वाचे स्थळ आहे. वज्रेश्वरी ही पार्वतीचे रूप मानली जाते. पोर्तुगीजांच्या विरोधात चिमाजी अप्पा पेशव्यांनी वसईचा किल्ला जिंकण्यापूर्वी वज्रेश्वरीदेवीला नवस केला होता. वसईचा किल्ला जिंकल्यामुळे नवसाला पावणारी देवी अशी या देवीची ख्याती पसरली आणि ती आजही कायम आहे. त्रेता युगात वसिष्ठ ऋषींच्या त्रिचंडी यज्ञाच्या वेळी पार्वती वसिष्ठांच्या संरक्षणासाठी आली. तिने इंद्राचे वज्रास्त्र गिळले. म्हणून रामाच्या विनंतीवरून तिला वज्रेश्वरी हे नाव पडले. मंदिरातील देवीच्या मूर्तीच्या हातात खड्ग आणि गदा आहे. वसई किल्ला जिंकल्यानंतर चिमाजी अप्पांनी किल्ल्यासारखे मंदिर बांधून नवस फेडला.

मध्य रेल्वेच्या अंबरनाथ स्टेशनपासून हे मंदीर जवळ आहे.

संदर्भ व नोंदी[संपादन]