मरीन लाइन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मरीन लाईन्स मुंबईतील उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावरील स्थानक आहे.

मरीन लाईन्स is located in मुंबई
मरीन लाईन्स
मरीन लाईन्स
मरीन लाईन्स

सगळ्या मंद गतीच्या गाड्या या स्थानकावर थांबतात.

उत्तरेकडे जाणाऱ्या बहुतेक गाड्या येथे थांबतात. सकाळ-संध्याकाळची गर्दीची वेळ सोडुन चर्चगेटकडे जाणाऱ्या जलद गाड्याही येथे थांबतात.

जवळचे भाग[संपादन]

मरीन ड्राईव्ह, प्रिन्सेस स्ट्रीट, काळबादेवीला जाण्याकरता येथे उतरावे.

शाळा, कॉलेज, ई.[संपादन]

मरीन लाईन्सच्या स्थानकाला लागूनच पश्चिमेला पारसी जिमखाना, मुस्लिम जिमखाना, हिंदु जिमखाना आहेत.

पश्चिमेकडून जाणाऱ्या समुद्र किनाऱ्याला समांतर असलेल्या रस्त्यावरून उत्तर दिशेला चर्नी रोड व पुढे वाळकेश्वरमार्गे राजभवन तसेच बागेकडे जाता येते.आपण त्याच मार्गाने दक्षिणेकडे गेल्यास नरीमन पॉईंट, कफ परेड, कुलाबा, चर्चगेट, हुतात्मा चौक, इलेक्ट्रीक हाऊस, खुसरो बाग,वोडहाऊस, गेट वे ऑफ इंडिया, ससून डॉक्स, काळा घोडा इत्यादी परिसरात जाऊ शकतो.