मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग
मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग | |||
---|---|---|---|
प्रदेश | महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश व तमिळनाडू | ||
मालक | भारतीय रेल्वे | ||
चालक | मध्य रेल्वे, दक्षिण मध्य रेल्वे, दक्षिण रेल्वे | ||
तांत्रिक माहिती | |||
मार्गाची लांबी | १,२८१ किमी (७९६ मैल) | ||
ट्रॅकची संख्या | १/२ | ||
गेज | १६७६ मिमी ब्रॉड गेज | ||
विद्युतीकरण | अंशत: | ||
कमाल वेग | १३० किमी/तास | ||
|
मुंबई-चेन्नई रेल्वेमार्ग हा भारतामधील एक प्रमुख रेल्वेमार्ग आहे. मुंबई व चेन्नई ह्या दोन मोठ्या महानगरांना जोडणारा हा १,२८१ किमी लांबीचा मार्ग महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश व तमिळनाडू ह्या राज्यांमधून धावतो. हा मार्ग मुंबई-सोलापूर-गुंटकल-चेन्नई इग्मोर असा आहे. महाराष्ट्रातील लोणावळा, पुणे, दौंड, सोलापूर इत्यादी महत्त्वाची स्थानके ह्याच मार्गावर आहेत.
प्रशासकीय सोयीसाठी हा मार्ग खालील ४ पट्ट्यांमध्ये विभागला गेला आहे.
इतिहास
[संपादन]भारतामधील पहिली रेल्वे १६ एप्रिल १८५३ रोजी व्हिक्टोरिया टर्मिनस ते ठाणे दरम्यान धावली. १८५४ मध्ये हा मार्ग कल्याणपर्यंत वाढवला गेला. १८६२ साली बोरघाटामध्ये रेल्वेमार्गाचे काम पूर्ण झाले व मुंबई व पुणे रेल्वेद्वारे जोडले गेले. १८७१ साली रायचूर येथे मद्रास रेल्वे व ग्रेट इंडियन पेनिस्युला रेल्वे ह्यांचे मार्ग जुळले व मुंबई व मद्रास हा मार्ग पूर्ण झाला.
मुंबई व चेन्नई दरम्यान धावणाऱ्या दादर चेन्नई इग्मोर एक्सप्रेस, मुंबई-चेन्नई मेल इत्यादी गाड्या ह्याच मार्गावरून धावतात.