लोकमान्य टिळक टर्मिनस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लोकमान्य टिळक टर्मिनस

लोकमान्य टिळक टर्मिनस (जुने नाव कुर्ला टर्मिनस) हे भारताच्या मुंबई शहरामधील एक मोठे रेल्वे टर्मिनस आहे. कुर्ला उपनगरामधील हे स्थानक मुंबई मुंबई उपनगरी रेल्वे हार्बर मार्गावरील कुर्लाटिळकनगर ह्या स्थानकांच्या जवळ आहे. ५ फलाट असलेल्या ह्या स्थानकामधून दररोज अनेक गाड्या सुटतात. छत्रपती शिवाजी टर्मिनस ह्या मध्य रेल्वेवरील प्रमुख स्थानकावरील वाहतूकीचा ताण कमी करण्यासाठी हे स्थानक बांधले गेले. लोकमान्य टिळक टर्मिनस भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे विभागाच्या अखत्यारीत येते.

ह्या स्थानकामधून मुख्यत: उत्तर भारतामधील स्थानांकडे जाणाऱ्या गाड्या सुटतात.

बाह्य दुवे[संपादन]

गुणक: 19°4′12″N 72°53′24″E / 19.07, 72.89