रायचूर रेल्वे स्थानक
Jump to navigation
Jump to search
रायचूर मध्य रेल्वे स्थानक | |
---|---|
फलक | |
स्थानक तपशील | |
पत्ता | रायचूर, कर्नाटक |
गुणक | 16°11′37″N 77°20′22″E / 16.1935°N 77.3394°E |
समुद्रसपाटीपासूनची उंची | ४०६ मी |
मार्ग | मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग |
जोडमार्ग | रायचूर-काचीगुडा रेल्वेमार्ग |
फलाट | ३ |
इतर माहिती | |
उद्घाटन | इ.स. १८७१ |
विद्युतीकरण | नाही |
संकेत | RC |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
चालक | दक्षिण मध्य रेल्वे |
स्थान | |
|
रायचूर रेल्वे स्थानक हे कर्नाटकाच्या रायचूर जिल्ह्यातील रायचूर शहरात असलेले रेल्वे स्थानक आहे. या स्थानकाची निर्मिती इ.स. १८७१मध्ये झाली. त्याआधी ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वे (जी.आय.पी.) आणि मद्रास रेल्वे हे दोन रेल्वे मार्ग अनुक्रमे मुंबईकडून आणि चेन्नईकडून एकमेकांकडे बांधले जात होते. रायचूर स्थानकात हे दोन्ही मार्ग एकमेकांस मिळाले व मुंबई-चेन्नई रेल्वेमार्ग पूर्ण झाला.
येथून जाणाऱ्या बव्हंश गाड्या येथे थांबतात.