Jump to content

न्यू झीलंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२१
इंग्लंड
न्यू झीलंड
तारीख २ – १४ जून २०२१
संघनायक ज्यो रूट केन विल्यमसन (१ली कसोटी)
टॉम लॅथम (२री कसोटी)
कसोटी मालिका
निकाल न्यू झीलंड संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा रोरी बर्न्स (२३८) डेव्हन कॉन्वे (३०६)
सर्वाधिक बळी ओलिए रॉबिन्सन (७) टिम साउदी (७)
नील वॅग्नर (७)
मालिकावीर रोरी बर्न्स (इंग्लंड) आणि डेव्हन कॉन्वे (न्यू झीलंड)

न्यू झीलंड क्रिकेट संघाने दोन कसोटी सामने खेळण्यासाठी जून २०२१ मध्ये इंग्लंडचा दौरा केला. इंग्लंडविरुद्धची मालिका झाल्यानंतर न्यू झीलंडने भारताबरोबर कसोटी विश्वचषकाचा अंतिम सामना इंग्लंडमधेच खेळला. न्यू झीलंड क्रिकेट बोर्डाने इंग्लंड मालिका आणि कसोटी विश्वचषक अंतिम सामन्यासाठी एकच संघ निवड केली.

पहिली कसोटी अनिर्णित सुटली. न्यू झीलंडचा डेव्हन कॉन्वेने कसोटी पदार्पणातच द्विशतक ठोकले. लॉर्ड्स मैदानावर असा विक्रम करणारा डेव्हन कॉन्वे आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या १४४ वर्षांच्या इतिहासातला पहिला खेळाडू ठरला. केन विल्यमसन दुखापतग्रस्त झाल्याने टॉम लॅथमला दुसऱ्या कसोटीकरता न्यू झीलंडचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. दुसरी कसोटी ८ गडी राखून जिंकत न्यू झीलंडने १९९९ नंतर प्रथमच इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकली. तसेच २०१४ मध्ये श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका हरल्यानंतर इंग्लंडला प्रथमच मायदेशात कसोटी मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले.

सराव सामने[संपादन]

दोन-दिवसीय सामना:लॅथम XI वि विल्यमसन XI[संपादन]

२७-२८ मे २०२१
धावफलक
वि
२८९/६घो
डेव्हन कॉन्वे ५५*
नील वॅग्नर २/१८ (१५ षटके)
२९४/५
डॅरियेल मिचेल ६४*
काईल जेमीसन २/३० (१४ षटके)
सामना अनिर्णित.
रोझ बोल, साउथहँप्टन
  • नाणेफेक: लॅथम XI, फलंदाजी.
  • संघांनी खेळलेले एकूण षटके आणि फलंदाजांनी सामना केलेले एकूण चेंडूंची आकडेवारी उपलब्ध नाही.

कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

२-६ जून २०२१
धावफलक
वि
३७८ (१२२.४ षटके)
डेव्हन कॉन्वे २०० (३४७)
ओलिए रॉबिन्सन ४/७५ (२८ षटके)
२७५ (१०१.१ षटके)
रोरी बर्न्स १३२ (२९७)
टिम साउदी ६/४३ (२५.१ षटके)
१६९/६घो (५२.३ षटके)
टॉम लॅथम ३६ (९९)
ओलिए रॉबिन्सन ३/२६ (१४ षटके)
१७०/३ (७० षटके)
डॉम सिबली ६०* (२०७)
नील वॅग्नर २/२७ (१६ षटके)
सामना अनिर्णित.
लॉर्ड्स, लंडन
पंच: मायकेल गॉफ (इं) आणि रिचर्ड केटलबोरो (इं)
सामनावीर: डेव्हन कॉन्वे (न्यू झीलंड)


२री कसोटी[संपादन]

१०-१४ जून २०२१
धावफलक
वि
३०३ (१०१ षटके)
डॅन लॉरेन्स ८१* (१२४)
ट्रेंट बोल्ट ४/८५ (२९ षटके)
३८८ (११९.१ षटके)
विल यंग ८२ (२०४)
स्टुअर्ट ब्रॉड ४/४८ (२३.१ षटके)
१२२ (४१.१ षटके)
मार्क वूड २९ (३८)
नील वॅग्नर ३/१८ (१० षटके)
४१/२ (१०.५ षटके)
टॉम लॅथम २३* (३२)
ओली स्टोन १/५ (१ षटक)
न्यू झीलंड ८ गडी राखून विजयी.
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
पंच: रिचर्ड इलिंगवर्थ (इं) आणि रिचर्ड केटलबोरो (इं)
सामनावीर: मॅट हेन्री (न्यू झीलंड)
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.