Jump to content

कसबा पेठ (पुणे)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कसबा पेठ, पुणे हा भारताच्या पुणे शहरातील एक प्राचीन भाग आहे. हा पुणे शहराचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे या भागात भरपूर वाडे दिसून येतात.

कसबा पेठ हा पुणे, भारतातील सर्वात जुना निवासी भाग, "पेठ" (परिसर) आहे. हे ऐतिहासिक शनिवार वाडा राजवाडा-किल्ल्याला लागून आहे. कसबा पेठ ही पाचव्या शतकात कधीतरी स्थापन झालेली पहिली पेठ होती आणि पुण्यातील सर्वात जुनी पेठ आहे. त्याला "पुणे शहराचे हृदय" असे म्हणतात. पुण्याच्या इतिहासात हे शहर एकेकाळी ‘कसबे पुणे’ म्हणून ओळखले जात असे.

इतिहास

[संपादन]

एकेकाळी पुणे शहर पूर्वी कसबा पेठेपुरते मर्यादित होते. त्यावेळी ते कसबे पुणे या नावाने ओळखले जाई. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत त्याचा विस्तार झाला. आदिलशाही मध्ये कसबे पुणे हे दुर्लक्षित गाव होते. सर्वत्र रोगराई आणि घाण पसरलेली होती. आदिलशहाने शिवाजीचे वडील शहाजी भोसले यांना पुणे मुलुखाची जहागिरी दिली.१६४२ला आई जिजाबाई या बाल शिवाजीस घेऊन पुण्यात आल्या. त्यावेळी त्यांनी पुण्याची झालेली दुरवस्था पाहून कसबे पुण्याचे रूप पालटवून टाकण्याचे ठरविले. या कार्यावर लोकांचा विश्वास बसावा आणि या कामासाठी त्यांचे सहकार्य मिळावे यासाठी शिवाजी महाराजांकरवी जिजाबाईने कसब्यात सोन्याचा नांगर फिरवून कसबे पुणे पुन्हा भरभराटीला आणले. शिवाजीचे महाराजांचे बालपण त्यांची आई जिजाबाई यांच्या समवेत कसबे पुण्यातील लाल महाल येथे गेले. कसबा पेठेचे रूप पालटण्यास दादोजी कोडदेव यांचा सक्रिय सहभाग होता.

कसबा पेठेतील उल्लेखनीय स्थळे

[संपादन]
  • कसबा गणपती मंदिर : हे पुण्याचे ग्रामदैवत आहे.
  • कुंभारवाडा
  • गावकोस मारुती मंदिर
  • झांबरे चावडी
  • तांबट आळी
  • त्वष्टा कासार देवी मंदिर : ही देवी कासार समाजाची कुलदेवी समजली जाते..
  • त्र्यंबकेश्वर मंदिर
  • पुण्येश्वर मारुती मंदिर
  • शिंपी आळी
  • शेख सल्ला याचा दरगा
  • साततोटी हौद